Saturday, February 22, 2020

भाषा - the connect

आमचे इस्त्रिवाले भैया म्हणजे बाप लेक जोडी आहे. कधी बाबा येतात कधी मुलगा येतो कपडे न्यायला घ्यायला.मुलगा चेहऱ्यावरून मराठी वाटला नाही, म्हणून मी त्याच्याशी हिंदीत बोलायला सुरुवात केली. बाबा मात्र स्वतःहून माझ्याशी मराठीत बोलायला लागले. अगदी मराठी accent वाटला , आणि त्यांचा चेहरा महाराष्ट्रीय  वाटला.  ते मराठी बोलतात म्हणून त्यांच्याशी वेगळाच connect वाटला. मी सहज विचारलं, तुम्ही मराठी आहात का? ते म्हणाले, मी यूपी चा आहे, पण बरेच वर्ष महाराष्ट्रात आहे.   

बंगलोरला हॉस्टेल मध्ये होते तेव्हा इथे कोण जास्त‌ मराठी बोलणारे भेटत नाही याची खंत वाटायची मला.  मग कोणी मराठी बोलणार भेटलं की खूप मस्त वाटायचं.

माझ्या आईची आई आणि बाबांची आई दोघीही मालवणी ( कोकणी सारखी) भाषा बोलायच्या. त्या भाषेत डाळीच्या आमटीला डाळीचा सांबारा म्हणतात. आई अजूनही मराठीत बोलताना असे मालवणी शब्द वापरते. 

स्वित्झर्लंड येथील jungfraujoch ला जाणाऱ्या ट्रेन मध्ये स्वागत करण्यासाठी नमस्कार म्हटलं जातं आणि तेव्हा आपल्या हृदयात ला एक कोपरा सुखावतो. बहुतांश प्रवासी भारतीय असल्यानं त्यांनी असं केलं असावं. 

आमच्या मुलीशी आम्ही मराठी बोलतो. ती आधी फार छान इंग्लिश बोलत नसे. म्हणून आम्ही घरात इंग्लिश बोलायला सुरुवात नाही केली. आता ती इंग्लिशमध्ये सुद्धा छान बोलते. ती इंग्लिश शाळेत जाते. पण तिला उत्कृष्ट मराठी लिहिता बोलता आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. काल mother language day होता. त्यानिमित्ताने हे लिखाण .  

#मराठी
#motherlanguageday
#unesco

-Dhanashree
https://dsaidso.blogspot.com

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...