Wednesday, July 5, 2023

बाईपण भारी देवा - Movie Review

अगदी धमाल मूवी - 

वंदना गुप्तेचं मराठमोळं हिंदी याने सुरुवात होते या चित्रपटाची " मेरे पाच बेहेन कि तर्हाच वेगळी हैं - नग हैं नग "

आणि मग ह्या सहा बहिणींची मंगळागौर स्पर्धेसाठी तयारी - आणि या तयारीमध्ये उलगडले जाणारे प्रत्येकीच्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू . 

या सहा बहिणी - आपल्याने परीने आपल्या आयुष्याचे प्रश्न सोडवत पुढे चालल्या आहेत. 

चित्रपटात Depression , Menopause  , Divorce हे विषय अगदी सहजतेने हाताळले आहेत. 

थेरपी साठी घेऊन जाणारा नवरा, 

नवरा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे हे accept करत  त्याला divorce देणारी बायको 

कसलीही कला perform करायला बंधन असणारी बहीण, मंगळागौर स्पर्धेत भाग घेणं 

मग मध्येच एकीला जाणवतंय- या धकाधकीच्या आयुष्यात आपण श्वास घ्यायला विसरलो का? अर्ध आयुष्य संपलं आणि स्वतः साठी जगलोच नाही?

आपल्या सर्वांनाच विचार करायला लावणारा हा प्रश्न....


 सर्वात सुंदर - या चित्रपटाचा शेवटचा dialogue आणि मेसेज

"विसरून जाऊ स्पर्धा, नको ती भांडणं ,आपणच आहोत आपल्या आयुष्यातलं चांदणं"


Picture जरूर बघा - वंदना गुप्ते म्हणतात तसं - या धकाधकीच्या आयुष्यात थोडा तरी ब्रेक हवा 


@officialjiostudios @emveebeemedia @kedarshindems 

@sukanyamoneofficial @vandanagupteofficial @deepaparabchaudhariofficial @shilpanavalkar 


#baipanbharideva

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...