आज माझ्या बाबांचा वाढदिवस -कितवा ते महत्वाचा नाही. महत्वाचं हे कि अजूनही ते तरुणच आहेत. काम करण्याचा त्यांचा उत्साह आणि चिकाटी मला लाजवेल अशी आहे.
Poetry, My parenting stories, Management , Daily experiences and much more.. In English as well as Marathi
Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts
Sunday, November 22, 2020
हैप्पी बर्थडे बाबा
बाबांचं जन्म वेंगुर्ल्यात झाला. दहावीपर्यंत ते तिकडे शिकले आणि मग सायन्स कॉलेजसाठी मुंबईला आले.
बाबांच्या लहानपणी घरची आर्थिक परिस्तिथी जेमतेमच होती. पण त्या परिस्तिथीत सुद्धा बाबांनी अभ्यास करून उत्तम यश मिळवले. scholarship मिळवली. बाबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. पपेरसुद्धा ते अगदी पूर्णपणे वाचतात. त्यांचं drawing उत्तम आहे. लहानपणी ते कविता करायचे. मला जेव्हा बाबांचे गावातले मित्र , ओळखीचे भेटतात तेव्हा बाबांच्या हुशारीबद्दल नेहेमीच कौतुक असतं .
मुंबईत आल्यानंतर त्यांनी पार्ले कॉलेज( साठ्ये कॉलेज) मध्ये सायन्स साठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना इंजिनीरिंग साठी V.J.T.I मध्ये प्रवेश मिळाला. माझे बाबा V.J.T.I मधून B.E (Mechanical ) डिग्री होल्डर आहेत. मुंबईत १० बाय १० च्या एका खोलीत राहण्यापासून ते स्वतःच घर घेण्यापर्यंतचा प्रवास मला नेहेमीच प्रेरित करतो. मुंबईत नवीन असून 35व्या वर्षी बाबांनी मुंबईत स्वतःचा एक फ्लॅट घेतला ही किती मोठी गोष्ट आहे हे मला स्वतःचा संसार सुरु झाल्यावर कळलं.
लहानपणी बाबा मला अंघोळ घालून शाळेसाठी रेडी करून मग ऑफिसला जायचे. Maths चा अभ्यास तेच घ्यायचे .अगदी कॉलेजमध्ये असतानासुद्धा मला बाबांचं खूप मार्गदर्शन होतं बाबांमुळे मी फोकस करायला शिकले. बाबांचं म्हणणं हेच, कि तू दहा गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. एक- दोन गोष्टी कर पण त्या अगदी टॉप कर . दुसरी बाबांची शिकवण म्हणजे काहीही नवीन सिनेमा असो, शॉपिंग असो, आपलं काम संपवून मग ते करायचं .त्यामुळेच कंटाळा आला म्हणून फिरायला गेलो आणि काम तिकडेच असं मी कधीच करत नाही. मी IIM मध्ये असताना सुद्धा homesick झाले, किव्वा थोडा स्ट्रेस वाटला तरी बाबा मला भेटायला यायचे.
बाबांचं घरात सगळ्या कामात लक्ष असतं आणि ते काम करतात सुद्धा. त्यामुळे मुलांना हे जमत नाही, करत नाही ह्या मागासलेल्या संस्कृतीची मला अजिबात सवय नाही.
माझ्या बाळंतपणासाठी आई मुंबईला आली असताना माझ्या बाबांनी बंगलोरला स्वयंपाक केला. तेव्हा बाबा आणि आई भावाबरोबर बंगलोरला होते.
माझ्या मोठ्या मुलीला जवळजवळ २ वर्षांपर्यंत माझ्या आई, बाबा आत्यांनीच सांभाळलं . तेव्हा मला आठवतंय मला एका नातेवाइकाने सांगितलं होतं - " आजोबांकडून नातवंडाला सांभाळण्याची अपेक्षा कारणच चुकीच आहे " . मला ते फार विचित्र वाटलं - एका परदेशी शिकलेल्या मुलीचे इतके बुरसटलेले विचार कसे असू शकतात . नंतर लक्षात आलं कि तिच्या बाबांनी तिच्यासाठी किंवा घरासाठी नोकरीशिवाय काही केलं नसल्यामुळे, पुरुष मुलांना सांभाळू शकतात हे तिला पटत नव्हतं.
माझे बाबा माझ्या मुलीला भरवायचे, शी सु चा diaper सुद्धा बदलायचे.
गेल्या सात वर्षात मी आणि माझ्या नवऱ्याने अनेक घरं बदललीत. त्या शिफ्टिंग मध्ये , आमच्या बरोबरचा कॉन्स्टन्ट सपोर्ट म्हणजे बाबा. सपोर्ट काय, खरा सांगायचं तर त्यांनीच आमचं शिफ्टिंग केल . गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मी नवीन ठिकाणी शिफ्ट झाले. त्यावेळेला माझ्याबरोबर ३ महिन्याचा बाळ होतं . बाबासोडून आम्हाला दुसरं कोणीही मदत करायला नव्हतं . मावशी मला १० दिवस मैत्रिणीकडून आणलेला डबा पोचवत होती. त्या घरात शिफ्टिंग च्या आधी गॅस लावण्यापासून , साफ सफाई करून घेण्यापासून ते सगळं सामान लावेपर्यंत बाबा आमच्यासोबत होते. ते करण्यासाठी ते मालाड ते दादर येत होते. आम्ही शिफ्ट झाल्याच्या २-३ दिवसानंतर माझ्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला होता. २-३ दिवसातच एवढं कसं लावून झालं हे बघून तो आश्चर्यचकित झाला. सगळी बाबांची कमाल होती.
लोक मोठे मोठे शब्द वापरतात - आम्ही मुलांना exposure देतो, हे करतो ते करतो. बाबा स्वतःची शोबाजी करणार नाहीत. पण माझ्यासाठी जे त्यांनी केलाय त्याला मी women empowerment म्हणते. त्यांचा आधार, ते कधीही माझ्यासाठी धावून येतील हा विश्वास, माझ्या मुलींची काळजी घेतील हा कॉन्फिडन्स त्यामुळे मी नोकरी करू शकते आणि माझ्या मुलींसमोर एक करिअर ओरिएंटेड वूमन चा आदर्श ठेऊ शकते.
- धनश्री
Sunday, October 11, 2020
Happy Birthday Meena Atya
It is my Aunt's 75th birthday today. We stayed together and she took care of us while we were growing up. Despite living in the same city, we did not meet today because of COVID social distancing protocol . They are senior citizens and I felt it was best to talk on phone and celebrate. Atya also did not force me to visit, she will never put others in a difficult situation anyway. I wrote a small write up on her, and it covers just maybe 1 % of what she did for us.
I could go on and on writing, this is just a small start maybe
माझ्या मीना आत्याचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे . पंच्याहत्तर म्हणजे लोक म्हातारं म्हणतात. काही लोक आम्ही केस रंगवतो आणि मेकअप करतो म्हणून आम्ही तरुणचं आहोत असं म्हणतात. काही लोक वय हे काम न करण्याचं excuse म्हणून वापरतात. माझ्या आत्याचं असं काहीच म्हणणं नसतं . जे आहे ते आहे. आपल्याला जमेल ते, पटेल ते आणि आपल्या संस्कारात बसेल ते करत रहावं असं तिचं म्हणणं असतं . लोकांचं चांगलं घ्यावं आणि वाईट सोडून द्यावं.
मीना आत्या शाळेत शिक्षिका होती. भूगोल, मराठी , संस्कृत, इंग्लिश हे विषय तिने शिकवले. ती आर्टस् ग्रॅजुएट आणि बी. एड. आहे. ग्रॅजुएशन झाल्यानंतर पोस्टग्रॅज्युएशन कर असे तिला तिचे शिक्षक सांगत होते. पण घरच्या परिस्तिथीमुळे नोकरी करणं गरजेचं होतं . लहानपणापासून आत्याला स्पोर्ट्सची आवड होती. कॅरम हा तर तिचा आवडता खेळ आणि त्यात तिने बक्षीसंही मिळवली आहेत . अगदी हल्लीचीच गोष्ट - २०१६ साली गावी गेली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिनियर सिटीझन कॅरम स्पर्धेत तिला बक्षीस मिळालं . मीना आत्या बद्दल लिहायला गेलं तर खूप आहे . इतकं की त्याबद्दल एक पुस्तकंच होईल. आठवणी खूप आहेत - वाढदिवसानिमित्त सुरुवात तरी करतेय.
लहानपणापासून मी ,आई ,बाबा ,माझा भाऊ, आत्या आणि आजी एकत्र राहतोय. आजी, आई बाबा, आत्यांनी आम्हाला वाढवलं . माझा भाऊ झाल्यानंतर बाय आत्या ( आमच्या वरच्या माळ्यावर राहायची) आम्हाला शाळेत सोडायची आणि मीना आत्या शाळेतून आणायची. अजूनही मी आईकडे गेले की लोकं याची आठवण काढतात. समजा मीना आत्याला काही काम असेल त्यावेळी, किंवा बाय आत्याला काही काम असेल , तर त्या आपसात ऍडजस्ट करायच्या . माझ्या आईला कधी मुलांना शाळेत सोडण्याचा प्रश्न सोडवावा लागला नाही, किंवा मुलांना कोण सांभाळणार हा प्रश्न पण कधी सोडवावा लागला नाही . आत्या आम्हाला अभ्यासात मार्गदर्शन करायची. वक्तृत्व स्पर्धेसाठी लायब्ररीतुन पुस्तक आणायची , काय लिहायचं ते सांगायची. वेगवेगळ्या परीक्षांसाठी बसायला प्रोत्साहन द्यायची.
माझी आई एअर इंडियात होती. त्यामुळे लहान असताना आम्ही विमानाने फिरायला जायचो. आजीबरोबर सोबत पाहिजे म्हणून आत्या थांबायची. कधीही तिने - तुमचं बाबा बरं आहे, तुम्हाला फिरायला मिळतं असं म्हटलं नाही. हल्ली असं बोलणारे लोकं सर्रास दिसतात , म्हणून आत्याच्या स्वभावाचं जास्तच कौतुक वाटतं. आत्या आम्हाला गावाला घेऊन जायची - मी, भाऊ आणि आत्या. आत्या अजून कुठे गेली तर आईला सुट्टी घ्यावी लागेल म्हणून आत्या आम्हाला घेऊन गावाला जायची. मे महिन्याचा सुट्टीत आम्ही खूप मजा करायचो. आत्या आमच्याबरोबर चेस, कॅरम, पत्ते खेळायची. मुख्य म्हणजे आम्हाला सांभाळायला लागतं म्हणून सुट्टीत समर कॅम्पला टाक अशी तिने माझ्या आई बाबांवर कधीही जबरदस्ती केली नाही. आत्या आणि आजीमुळे आमच्या सुट्ट्या मस्त carefree अख्खा दिवस खेळण्यात गेल्या.
आत्याचा शाळेतल्या ६ मैत्रिणींचा ग्रुप. कधी कधी मैत्रिणींनी भेटायला बोलावलं , आणि आमची काही परीक्षा असेल, आजीला काही बरं नसेल तर आत्या जायची नाही. आमच्यासाठी, घरासाठी थांबायची. अर्थात म्हणजे आई हे तेच करायची घर पहिलं. हल्ली - मी लहान मुलाला सोडून कशी फिरायला गेले हे मिरवण्याची पद्धत आहे. पण माझी आत्या आमच्यासाठी थांबली - एकदा नाही अनेकदा. नुसता माझ्यासाठी नाही , माझ्या मुलींसाठीसुद्धा . मी बंगलोरला असताना माझ्या आईला मुंबईला येण्याची गरज होती. तेव्हा मीना आत्या वेंगुर्ल्याला जाणार होती, तिकीट बुक होतं . पण ती माझ्या गरजेसाठी , मुलीला सांभाळण्यासाठी बंगलोरला आली. आत्याला मी विचारलं --" हल्ली स्वतःच्या मुलांसाठी , नातवंडांसाठी पण कोणी असं करत नाही, तू किती केलंस ". त्यावर तिचं म्हणणं -" मी माझ्या नातीसाठी केलं , तुला त्रास होऊ नाय, तू आमची म्हणून केलं ".
पैशाच्या बाबतीत, एकूणच आमच्या घरात काटकसरी आणि नसता खर्च न करण्याचं वातावरण होतं . मी नोकरीला लागल्यावर आत्याने मला savings करण्याची सवय लावली . ती सवय असल्यामुळे मला MBA च्या फीसाठी खूप फायदा झाला. स्वतःचा वाढदिवस आला की काही लोकांना स्वतःच कौतुक, गिफ्ट्स घेण्याची सवय असते. कधी कधी तर आपण हे घेऊया का? असं म्हणून वाट्टेल ती महागडी गिफ्ट्स लोक मुलांकडून घेतात. आत्याची अशी वृत्ती नाही. आमच्या घरात कोणाचीच अशी वृत्ती नाही .
आता सर्वात महत्वाचं - माझी आई आणि आत्या एकत्र राहिल्या.संसारिक डावपेच कळायला लागल्यावर बायका किती डॅम्बीस आणि राजकारण करणाऱ्या असू शकतात हे बघितलं . माझ्या आईने आणि आत्याने दोघीनींही हे केलं नाही. मी माझ्या आईला फोन केला आणि आत्याला काही सांगायला सांगितलं तर ते तसंच नक्की सांगितलं जाणार हे माहीत आहे आणि आत्याला फोन केला तरी तेच. आई आम्ही लहान असताना काही खायला बनवायची ते आई ऑफिसला गेली असताना आत्या आम्हाला द्यायची- त्यामध्येही राजकारण करून मुलांची वाट लावणारे असतात. तसं आत्याने केल नाही. हल्ली घरातली कामं करायची नसतील तर लोक शनिवार रविवार बाहेर पडतात. आत्या तसं करू शकली असती, आणि माझी आईसुद्धा तसं करु शकली असती. म्हणजे दुसऱ्यावर , जो घरी आहे त्यावर काम ढकलायचे . दोघीनींही तसं केलं नाही.
लिहिण्यासारखं खूप आहे, ते लिहीनच . सर्वात महत्वाचं , आत्या माझ्या गरजेच्या वेळेला उभी राहिली . तेव्हा तिला अनेक पर्याय होते- नुसता आराम करण्याचा , जग भटकण्याचा , ..पण ती माझ्यासाठी धावून आली . म्हातारपणी सगळ्यांना मुलं , नातवंडं आठवतात कारण जेव्हा चालण्याची ताकत नसते तेव्हा सगळ्यांनाच नाती आठवतात. पण माझ्या आत्याला मी प्रायोरिटी वाटले तिला ऑपशन्स असताना, यांतच सगळं आलं
-धनश्री
Wednesday, June 12, 2019
आजी
"काहीतरी बोलूया " ही माझ्या लेकीची नेहमीची मागणी . मी इतकी बडबडी आहे, पण तो रेकॉर्ड आता माझ्या मुलीने तोडला आहे. एकतर फक्त तिने बोलले पाहिजे किंवा फक्त तिच्याशी लोकांनी बोलले पाहिजे हा अट्टाहास. रात्री झोपताना माझ्याकडून कुठली गोष्ट ऐकायची आणि बाबाकडून कुठली हे तिच्या मनात पक्क ठरलेलं . अशा माझ्या अनेक गोष्टींपैकी तिची आवडती गोष्ट म्हणजे सरस्वती आजीची गोष्ट . सरस्वती आजी म्हणजे माझी आजी, मी तिला आजीच म्हणायचे, लोक तिला ताई आजी म्हणायचे. स्वराने तुझ्या आजीचे नाव काय असे मला विचारले आणि तिचे नाव सरस्वती असे सांगितल्यावर ती स्वरासाठी सरस्वती आजी झाली. आजी मुळात मालवणी बोलायची आणि आमच्याशी मालवणी मिश्रित मराठी किंवा मराठी मिश्रित मालवणी. मालवणी भाषा ही कोकणी आणि मराठी या दोन भाषांच्या मधली भाषा म्हणायला हरकत नाही. मधली म्हटलं कारण ती थोडीफार मराठी आणि थोडीफार कोकणी सारखी वाटते. मालवणी बद्दल लिहिण्याचं कारण हे - माझी आजी काही मालवणी म्हणी सांगायची ज्याचा या काळातसुद्धा उपयोग पडतो, अर्थ लागू होतो. रोजच्या व्यवहारात त्याची आठवण नेहमी येते.
स्वराला जेव्हा सरस्वती आजीच्या गोष्टी ऐकायच्या असतात तेव्हा मी तिला आमचे रोजचे किस्से तर सांगतेच, त्याचबरोबर या म्हणीसुद्धा सांगते. एका दिवशी एक म्हण आणि त्याचं उदाहरण अशी साधारण आमची गोष्ट असते. तिला गोष्ट सांगताना नेहमी असं वाटतं कुठेतरी हे लिहून काढावं . पण आजीच्या इतक्या आठवणी भरून येतात की लिहिणं काही होत नाही. एक लिहायला घेतलं कि दहा गोष्टी आठवतात , आठवणीत, जुन्या काळात जाऊन, आजी नाही याचं दुःख होतं आणि मग लिहायला जमत नाही. पण आज ठरवलंच या लिखाणाला सुरुवात करायची. या विषयावर किती सातत्याने लिखाण होईल हे माहित नाही पण आज सुरुवात करतेय.
आजीला कुठलीही गोष्ट फुकट गेलेली आवडायची नाही. याचा अर्थ ती कंजूस होती असा नसून ती व्यवहारी होती असा आहे. उदाहरणार्थ - लहान असताना माझ्याकडे भरपूर खेळणी आणि कंपासबॉक्स होते. मला या दोन्ही गोष्टींची आवड. एवढ्या वस्तू असूनसुद्धा मी अजून त्यात काय नवीन दिसलं तर मला हवं असायचं .. एकदा तर मी business हा खेळ घरी असताना अजून एक वेगळ्या पॅकिंग मध्ये business दिसला म्हणून घेण्याचा हट्ट धरला. शाळेच्या result नंतर मला आजोळहून गिफ्ट असायचं. त्याप्रमाणे मी माझ्या आजोबांना business घ्या असं सांगितलं . घरी आल्यावर आजीने " घरी एक खेळ असताना दुसरा कशाला?" असं थोड्याफार रागातच विचारलं. एकसारखेच दोन खेळ, फक्त थोडेफार वेगळे दिसतात म्हणून घ्यायचे हे तिला पटतच नव्हतं. मी मात्र नवीन आणलेल्या खेळाबद्दल आजी बोलल्याने हिरमुसून बसले होते. मग थोड्यावेळाने आजीने माझ्या जवळ येऊन माझी समजूत काढली .ती म्हणाली" अगो धनु, अशे पैशे फुकट घालयणात नाय. आपल्याकडे पैसे नसले तर आपणाक कोणी विचारुचो नाय. बरा असताना सगळे येतीत पण गरज असताना कोण्णेक धावून येवचो नाय" तेव्हा हे ऐकताना फारच old-fashioned वाटत होतं . एक खेळ घेतल्याने काय येवढं बिघडणार आहे असं वाटायचं . त्यावर आजीचं म्हणणं एक खेळ घेण्याबद्दल नसून या वृत्तीबद्दल होतं असं ती म्हणाली. तिचं अजून एक म्हणणं होतं ते म्हणजे असे फुकट पैसे घालवण्यापेक्षा गोरगरिबांना मदत करावी.
माझी आजी २००६ साली गेली. आता तिला जाऊन बरीच वर्ष झालीत. आता मात्र एवढ्या वर्षात आजीचं बोलणं १००% पटलं. पैशाची चणचण कधीच भासली नाही पण आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती कळल्यावर लोकांच्या वागण्यात बदल होतो हे लक्षात आलं. "खर्च करायला काय झालं, पैसे तर येतच राहणार" असं म्हणून स्वत:चे पैसे राखून दुसऱ्याला चढवणारे आणि खर्चात पाडणारे भेटले, की आजीच्या शिकवणीची आठवण येते.
आपल्याकडे सगळं असताना लोक कसे वागतात आणि आपल्याला गरज असताना लोक कशी पाठ फिरवतात याचा अनुभव घेतला. आपल्याला गरज नसताना, सगळं छान चालू असताना सगळेच येतात. त्यातले जे कठीण प्रसंगात येतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात , तेच खरे आपले. याचा मला प्रत्यय अगदी सारखा येतो आणि आजीची आणि तिच्या असंख्य म्हणींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
आज पुलंचा स्मृतिदिन. पु ल सुद्धा म्हणाले होते " मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते."
-धनश्री
Thursday, January 10, 2019
My fashionista
आमच्या घरी जणू काही रोज फॅशन शो चालू असतो. माझी लेक स्वरा रोज छान छान बाहेर घालायचे frill चे frock, चनिया चोळी असे कपडे घरी घालून असते. आज तर तिने पॅन्ट वर चनिया चोळी चा backless ब्लाऊज घातला होता.
" अगं स्वरा backless का घातला आहेस? ठंडी नाही वाजत का?" अस मी विचारलं.
" अगं ओरडते कशाला? बोलून उपयोग काय.. ऐकणारे कुठे मी.. ऐकेल तर ती स्वरा कुठली" मला माझी साडे तीन वर्षांची लेक म्हणाली
मी थक्क होऊन गप्प आहे. ...
Translating in English..
There is like a fashion show going on in my house daily. My 3.5 year old daughter wears the finest of frill frocks, chaniya cholis day long at home. Today when I reached home , I saw her wearing a backless chaniya choli blouse and pant.
" Why are you wearing backless..Its cold na.." I said angrily..
" Why are you shouting? What's the use? Am I going to even listen?If I listen, how can I be swara even" my 3.5 year old daughter said.
I was stunned and shut up.
God knows, what's in store next.
Bhagwan , meri Raksha Karna!
-Dhanashree
#dsaidso

Thursday, December 6, 2018
आता वाजले की बारा..
आज माझ्या नवऱ्याच्या फ्लाईटमध्ये अतुल कुलकर्णी होते, अगदी बाजूच्या सीटवर. माझ्या नवऱ्याची फ्लाईट दुपारी १२ वाजताची होती ..११:३० ला त्याने मला अतुल कुलकर्णी बरोबरची सेल्फी पाठवली. तेव्हा अतुल कुलकर्णी यांच्या नटरंगमधलं "वाजले की बारा" हे गाणं सुचलं.. आणि त्यावरच आधारित ही पुढील कविता सुचली. हल्ली केलेल्या विमानप्रवासात( माझ्या किंवा कामानिमित्त माझ्या नवऱ्याच्या) विमान वेळेवर आलं - तर सगळं बरोबर आहे का ?असं वाटतं इतकी delayed flights ची सवय झाली आहे. अतुल कुलकर्णी फ्लाईटमधे असतील आणि ती delayed असेल, तर अशा वेळी कुठलं गाणं म्हणतील?
( कविता स्त्रीलिंगी लिहिलीय, कारण मूळ गाणं तसं आहे)
आज डिसेंबरची सकाळ, त्यात ६ डिसेंबर आज
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं पोचू जीवं झाला यडापीसा
ट्रॅफिकचा न्हाई भरवसा वेळ पाळंना
राखली की मर्जी बॉसची, फ्लाईट साठी आले
या धावपळीने चिंब ओली मी झाले
फ्लाईट निघेल कधी बरं, काळ येळ ठेवून तर
मला पोचू द्या ना वेळेत, निघा ना…
फ्लाईटला जाऊ द्या ना त्वरित , आता वाजले की बारा.
फ्लाईटला जाऊ द्या ना त्वरित , आता वाजले की बारा
फ्लाईटला जाऊ द्या ना त्वरित , आता वाजले की बारा
कशा पाई वेळ काढता, गोल गोल फिरता
असं काय कर्ता, हिला-
उडवा की लवकर तरी
९ ची बी फ्लाईट गेली १० ची बी गेली
आता ११ ची फ्लाईट निघाली
फ्लाईटला उडू द्या ना त्वरित, आता वाजले की बारा
आणि फ्लाईट सुरू झाली की ते काय म्हणतील ? ----" अप्सरा आली....." (विमान सुंदरीला बघून :))
-धनश्री
Https://dsaidso.blogspot.com

Thursday, November 29, 2018
जुळल्या सगळया त्या आठवणी
सगळ्यांचे लाडके आणि दादरकरांचे भूषण अशा देवकाकांच्या स्मृतिप्रत्यार्थ २७ डिसेंबर रोजी "जुळल्या सगळया त्या आठवणी" हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारकामध्ये मध्ये संपन्न झाला . देव काकांची विविध प्रकारची गाणी या कार्यक्रमात सादर झाली. नुसती गाणीच नव्हे तर त्या गाण्यांशी निगडित आठवणी , किस्से, त्यांच्या शिष्यांचे अनुभव या सगळ्यामुळे ती मैफिल अजूनच रंगली .
देवकाका हे आपल्याला उत्तम संगीतकार म्हणून माहित आहेतच. त्याचबरोबर ते एक उत्तम कवी , शिक्षक आणि माणूस कसे होते याची जाणीव या कार्यक्रमानंतर झाली.
देव काकांचं शिक्षण विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात झालं. पण लहानपणापासूनच घरी संगीताचे संस्कार होत गेले. त्यांच्या घरी मोठमोठे गवय्ये यायचे. आकाशवाणीत नोकरीसाठी गेले असताना त्यांना विचारल गेलं - तुम्हांला काय येतं? तेव्हा त्यांनी पेटी वाजवता येते असं सांगितलं. तेव्हा आकाशवाणीत पेटीवर बंदी होती . शेवटी त्यांना विचारलं गेलं , तुम्हाला सतार वाजवता येते का? तेव्हा ते नोकरी मिळवण्यासाठी सतार वाजवता येत नसूनही हो म्हणाले आणि मग चक्क ७ दिवसात सतार शिकले.
देवकाका नागपूर आकाशवाणीत नोकरीला असतानाची गोष्ट. साधारण १९६८-१९७० चा सुमारास संगीतकर प्रभाकर जोग यांनी देवकाकांना मुंबईहून पत्राद्वारे स्वर लिहून पाठवले. संगीतकाराने चाल लिहिली आणि मग त्यावर गाणं लिहिण्याचा हा देव काकांच्या आयुष्यातला पहिला योग . म्हणूनच "स्वर आले दुरुनी , जुळ्या सगल्या त्या आठवणी" हे अगदी त्या प्रसंगाला अनुसरून गाणं जन्माला आलं.
रवींद्र साठे नानासाहेबांबद्दल( ते देवकाकांना नानासाहेब म्हणत) म्हणाले ,"नानासाहेबांकडे गेलं की तुम्ही त्यांना काहीही विचारा, ते तुमचं ऐकून तुम्हांला मदत, मार्गदर्शन करणार. आता ते नाहीत, तर कोणाकडे जायचं हा प्रश्न आहे"
रंजना जोगळेकर देवकाकांबद्दल बोलताना म्हणाल्या , गायकांना ते कसे योग्य मार्गदर्शन द्यायचे. त्या काळात रंजना ताईंचा आवाज काहीतरी वेगळाच झालेला, गाणी छान होत नव्हती.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होत गेला. तेव्हाच देवकाकांनी त्यांना फोन करुन , तुझ्यासाठी एक गाणं लिहिलयं असं म्हणून बोलावून घेतलं. रंजन ताई तिकडे गेल्या आणि चक्क रडायला लागल्या, त्यांनी त्यांची समस्या सांगितली. देव काकांनी त्यांना एक गाणं लिहून दिलं आणि त्याचा रोज सराव करायला सांगितलं.त्याच बरोबर त्यांनी मी तुझ्यासाठी एक गाणं करुन ठेवणार आहे याबद्दल आश्वासन दिलं. देवकाकांना नंतर एक प्रोजेक्ट मिळालं होतं- १२ महिन्यांसाठी बारा गाणी बनवायची असं.त्यासंबद्धी त्यांनी प्रवीण दवणेंना एक गाणं लिहायला सांगितलं. काका म्हणले, "तू माघ महिन्यासाठी गाणं लिही" त्यावरून "माघाची थंडी माघाची" हे अगदी ठसकेबाज गाणं निर्माण झालं जे रंजना ताईंनीच गायलंय.
देव काकांनी अगदी वेगवेगळ्या प्रकारची गाणी रचली,लिहिली. युगुल गीतं , विडंबन,समस्वरी, बोलगीतं असं अनेक प्रकार. देवकाका ओशो रजनीश यांचे भक्त. ओशोंच्या शिकवण्यांवर त्यांनी हिंदी गाणीसुद्धा रचली.ते म्हणायचे- प्रेक्षकाला संगीताचा स्वर ताल हे व्याकरण कळत नसतं. मात्र भाव नक्की कळतो. अशी भाव पोचवणारी सुरेल बोलगीतं त्यांनी रचली. त्यातलाच एक बोलगीत म्हणजे - "सांग कसं जगायचं, कढत कढत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवायचं..." किती सुरेख गाणं आहे हे." देवकाकांची काही मस्त विडंबन गीतं या कार्यक्रमात होती . त्यातलं एक विवाहित पुरुषाने म्हटलेले गीत अणि त्याला दिलेले बायकोने उत्तर ही दोन्ही इतके सुरेख होती की बस क्या बात हैं अस वाटयाला लागलं. " जवा हैं मोहोब्बत हसीना हैं जमाना" या गाण्याच्या चालीवर एक लाजवाब समस्वारी गीत सादर झालं जयमाला 'once more' मिळालं.
बाकी कार्यक्रम अगदी उत्तमच झाला . दादर सांस्कृतिक मंचाचे त्याबद्दल आभार. उत्तरा मोनेंनी कार्यक्रमाचं सुरॆख निवेदन केलं. कार्यक्रम अगदी वेळेत सुरु झाला.स्टेज वर गायकांच्या मधोमध एक माईक आणि त्यासमोर देवकाकांची आवडती पेटी होती. जणू काय ते आपल्यातच आहेत. कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणी "जीवनात ही घडी अशीच राहूदे " असं वाटत होतं.
-धनश्री जोगळेकर (शिरोडकर)
https://dsaidso.blogspot.com
Friday, November 23, 2018
आपण करू ती फॅशन..
साल २०१३ - माझ्या लग्नाआधीची खरेदी चालू होती . साड्या खरेदी करुन झाल्या होत्या . आता ब्लाऊज शिवायला टाकायचे होते . मला स्वतःला मोठया गळ्याचे ब्लाऊज घालायला आवडत नाहीत . लोकांना ते छान दिसतात पण मला ते छान दिसत नाही असं मला वाटतं . त्यामुळे फॅशनच्या आहारी न जाता मी मला हवे तसे गळ्यांचे ब्लाऊज शिवून घेतले. ब्लाऊजच्या बाह्या मात्र फॅशनच्या आहारी जाऊन छोट्याच ठेवल्या. मला थोड्या लांब बाह्यांचे ब्लाऊज बरे दिसतील असं माझ्या घरच्यांचं मत होतं. पण मी मात्र त्यावेळेच्या फॅशन प्रमाणे छोट्या बाह्यांचे ब्लाऊज शिवले.
साल २०१८- आता सोशल मीडियावर #deepveer गाजतंय.
sabyasachi लुक वगैरे काय ते. आता दीपिकाच्या रिसेप्शनचे लुक बघा ना . ऑफ- व्हाईट प्लेन लांब हाताचा बंद गळ्याचा ब्लाऊज. खर सांगायचं तर आजीबाई सारखा वाटतोय तो मला. आणि सोनेरी कांजीवरम वर हिरवा मोठा चोकर ...वरती चपट , अगदी तेल लावल्यावर होतात तसे केस....कदाचित ह्यातलं सौंदर्य किंवा फॅशन कळण्याइतकी मी तज्ज्ञ नाही. बघून जे वाटलं ते लिहिलं. मात्र यावरून आजीची आठवण झाली. आजी म्हणायची " आपण करू ती फॅशन"... कदाचित या #deepveer आणि #virushka नंतर ही चपट केस आणि लांब बाह्या अगदी "in-thing in fashion" असेल.
आता माझ्या छोट्या बाह्यांचे ब्लाऊज 'out of fashion" नाही झाले म्हणजे मिळवलं. पण मग तेव्हा
आजी म्हणायची त्याप्रमाणे " आपण करू ती फॅशन"... म्हणायचं.
- धनश्री
Sunday, November 11, 2018
दिवाळी , फराळ आणि त्याचं दडपण
(Inspired by an earlier post by Mrinmayee Ranade-also shared on my wall earlier)
चला आता दिवाळी संपली. दिवाळीत बायकांना फराळ करण्याचं दडपण असत असं वाचण्यात आलं. तर हे दडपण का असावं? फेसबुक , social media वर बायका फराळाचे फोटॊ share करताना दिसतात. त्यामुळे हे दडपण येत असावं का ? घरातून घरचाच फराळ हवा अशी मागणी होत असेल का ?
त्यामुळे हे दडपण येत असावं का ?
बघूया...
आपण आपल्या आईला घरी सांग्रसंगीत फराळ करताना बघितलेलं असतं . कधीकधी अगदी नोकरी मुलं बाळं संभाळून हे सगळं तिने केलेलं असतं . मग त्यामुळे आपल्या मनांत आपल्याला आईसारखं करता आलं पाहिजे अशी इच्छा असते. ती कितपत चूक कि बरोबर याचा विचार करायला हवा. मागे मृण्मयी रानडे म्हणाल्याप्रमाणे , काळानुसार भरपूर बदल झाले आहेत . त्यामुळे दोन पिढ्यात होणार्या गोष्टींची तंतोतंत तुलना नाही होऊ शकत.
दुसरं दडपण फेसबुकवरील फोटोंमुळे येऊ शकतं . अमुक एक कोणातरी कसं सगळ करतेय आणि आपण कसं काहीच नाही करत असं वाटू शकतं. तर फेसबुक वरील दाखवायचे दात आणि घरात खायचे दात वेगळे असतात हे न कळण्याइतके आपण दुधखुळे नक्कीच नाही आहोत . तो फराळ पोस्ट टाकणाऱ्या बाईने केलेला असतो की मदतनीसांकडून करवून घेतलेला असतो हे कसं सांगणार ? आणि अगदी स्वतः केला असेल तर बाकीचे जेवण केले का नुसता फराळ बनवायचा म्हणून जेवण बाहेरुन मागवले?
आणि अगदी सगळा फराळ स्वतः केला असेल तर स्वतःच्या घरच्यांसाठी केला . कोणावर त्याचे उपकार नाहीत. ते करतात म्हणून त्याचं दडपण आपल्यावर नकॊ. प्रत्येकाची परिस्तिथी वेगळी. आणि त्यामुळे आपल्या सोयीनुसार प्रत्येकजण करतं.
कित्येक बायका लोकांना दिसायला पाहिजे म्हणून मुद्दामून दिवाळीच्या वेळी फराळ करतात . नाहीतर वर्षाचे बाकीचे महिने साधा स्वयंपाक करतील का याचा प्रश्न पडतो .हे मी माझ्या स्वतः बघितलेल्या अनुभवावरून सांगते.
जेवण केलं असो व नसो , पण ते वाढण्यात पुढे पुढे करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता त्या गोष्टींचं किचनमध्ये मधे रांधणाऱ्या बायकांनी दडपण घ्यावं का?
सांगण्याचा मुद्दा हाच की , फराळ घरी केला म्हणजे आपण सुग्रणपणाची परीक्षा पास झालो असं काही नाही . आपल्या घरच्यांसाठी आपण रोज पौष्टिक अणि घरच अन्न करणं महत्वाचं . मग ते स्वतः करा नाहीतर मदतनीसांकडून करुन घ्या.
आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन, फेसबुक फराळ फोटोस वरुन प्रेरणा घेऊन फराळ केला तर उत्तमच. पण तो नाही करता आला तर त्याचं दडपण नकॊ. कारण आपली सोय महत्वाची.
आणि हे नुसतं दिवाळी फराळाच्या बाबतीत लागू नाही. अनेक रीती-भाती निभावताना आपली सोय महत्त्वाची.
-धनश्री जोगळेकर
https://dsaidso.blogspot.com
Wednesday, October 10, 2018
एवढी मोठी झालीस तू धनू ?
मनीषा कोरडे लिहीतात, (http://www.esakal.com/saptarang/manisha-korde-write-navratri-article-saptarang-148206 )
"नवरात्र म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होण्याचाही जागरच. त्यासाठी खेळू हे नऊ खेळ. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देऊ आणि आपल्यामधल्या शक्तींचीही ओळख करून घेऊ..
१ला खेळ-
1. लहानपणीचा स्वतःचा एखादा फोटो उकरून काढावा आणि ती जी लहान मुलगी आहे, तिच्याकडं माया-ममतेनं बघावं. त्या अजाण अबोध दिवसांपासून ते आजवरच्या तिच्या प्रवासाचं कौतुक करावं. याचा अर्थ खूप जुन्या गोष्टी आठवत बसायच्या, असा नाही, तर त्या फोटोकडं बघून किंवा फोटो नसेल, तर मनात प्रतिमा आणून "छान, मस्त मोठी झालीस गं तू, पूर्वी काही कळायचं नाही तुला, आज किती शहाणी झालीस,' एवढंच म्हणायचं आहे. भूतकाळातल्या भूतांना शितं घालायची नाहीत ("मला यानं मारलं', "कमी मार्क मिळाले' असं डिटेलिंग करत बसायचं नाही). ज्या अस्तिक आहेत, त्यांनी त्या आपल्या छोटेपणातल्या मुलीला आशीर्वाद दिले तरी चालतील. ज्या नास्तिक आहेत त्यांनी त्या छोट्या लेकराचं कौतुक केलं तरी पुरे!
मुद्दा काय आहे? मुद्दा स्वतःत डोकावण्याचा आहे. ते होतंय का? या निमित्तानं ही जी एक जागा तयार होते आहे स्त्रियांसाठी- ती अनमोल आहे- तिचा पूरेपूर वापर आपण करतोय की नाही, हे बघणं महत्त्वाचं!
नऊ दिवसांचे नऊ नवे खेळ मी तुम्हाला सुचवणार आहे. आपण हे करून बघूयात का? मी तरी करणार आहे. तुम्ही ते केलंत, तर मजा येईल. "
या खेळानिमित्त मी माझ्या लहानपणीच्या आठवणी third person मधे लिहिल्या आहेत . लिहिण्यासारखं खूप आहे , पण आता थोडक्यातच संपवलंय.
एवढी मोठी झालीस तू धनू ?
अगं ,ती फोटोतली छोटी धनू ती तूच का ? दिवस कसे फटाफट जातात नाही ? तू एवढी मोठी झालीस यावर विश्वासच बसत नाही आहे माझा . लहान असताना तुला नटायची किती आवड होती . आणि हो , अभ्यासू आणि हुशार तर तू पहिल्यापासूनच होतीस .त्यामुळे जेव्हा तुला VJTI प्रवेश मिळाला , तेव्हा मला अजिबात नवल वाटलं नाही . घरच्यांचं उत्तम मार्गदर्शन, तुझी मेहनत आणि हुशारी सगळ्याचं जणू काही ते फळ होत.
तुला आठवतं का पहिल्या प्रयत्नात तुला IIM मिळालं नव्हतं तेव्हा तू किती निराश झाली होतीस ? नंतर शिक्षकांच्या , आईवडिलांच्या समजावण्याने तू परत जोमानं तयारी केलीस. "आपण कर्म करत राहावे , फळाची अपेक्षा करु नये" , ही विचारधारा मनाशी बाळगून तू खऱ्या अर्थानं प्रयत्न केलास. तुला त्या वर्षी यश मिळालच . IIM हॉस्टेलमध्ये एकटी कशी राहशील याचीसुद्धा तुला धाकधूक होतीच. पण तेही तू पार पाडलस की . Placement, CGPA या चक्रातून बाहेर पडलीस.
तुला लग्न होईपर्यंत कुठं काही फारसा स्वयंपाक येत होता? लग्नानंतर मात्र तू करत गेलीस आणि तुला सगळं जमत गेलं . अर्थात सुरुवातीचा काळ कठीण होताच. सुरुवात वरण भात बनवण्यापासून केलीस आणि आता चक्क सगळा स्वयंपाक तू करु शकतेस. तू कोणावरही त्याबाबतीत अवलंबून नाहीस.
स्वरा झाल्यवर तिचा बंगलोरला सांभाळ कसा होईल यांची काळजी होतीच न गं तुला. त्यावेळेलाही तुझ्यामागे आपली माणसं खंबीरपणे उभे राहिले आणि तुझी काळजी मिटली.
आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक कठीण प्रसंग आले .त्यांना तू किती समर्थपणे तोंड दिलंस की नाही ?
आजीचे संस्कार पाळत गेलीस , प्रमाणिकपणे वेळच्यावेळी आणि मन लावून काम केलंस. बऱ्याचदा यश आलं, काहीवेळा अपयशही आलं. तू मात्र तुझे प्रयत्न चालू ठेवलेस. या वाटचालीत साथ देणारी छान माणसं तुला भेटली.
कधीतरी असाच आपलं लहानपणीचा फोटो बघत जा, काय काय केलंस याचा आढावा घे . बघ कसं मस्त वाटेल तुला. अशीच मोठी हो, माझे आशिर्वाद तुझ्यासोबत कायम आहेत .

Tuesday, October 9, 2018
स्वरा_करे_तो_क्या_करे
एखादा विषय कठीण असतो . त्या विषयाचा पेपर कठीण येणार असा आपला अनुभव सांगतो. म्हणजे अशा पेपर मध्ये आपल्याला पास होण्यापुरते मार्क मिळाले तरी खूप असं आपल्याला वाटतं .मग अखेर तो दिवस येतोच- परीक्षा सुरु होतात आणि हा हा म्हणता त्या पेपरचा दिवस उजाडतो. आपल्याला एका मागो माग एक ,पेपरातले सगळे प्रश्न सोडवता येतात. आपण स्वप्नात आहोत की काय असा आपल्याला सारखा प्रश्न पडतो . परत तोच प्रश्न वाचून त्यात काही अजून "trick question" नसेल ना ह्याचा विचार करतो .तोवर पपेरची वेळ संपलेली असते आणि आपल्याला " पेपर सोपा होता ह्याचा आनंद कि पेपर एवढा सोपा कसा असू शकतो" ह्याचा विचार करावा हेच कळत नाही .
आज अगदी असंच काहीतरी घडलं . तसं म्हणाल तर माझी लेक तिच्या बोलण्यामुळे, इकडे तिकडे पळण्याच्या कलेमुळे मला सार्वजनिक ठिकाणी, रेस्टॉरंट्स मधे बरीच प्रसिद्धी मिळवून देते. कधीकधी तर " हे मूल कुणाचं " इथपर्यंत मला प्रसिध्दी मिळाली आहे .
आज रेस्टॉरंट मध्ये पहिली १५ मिनिटं झाली तरी लेक फक्त एक ठिकाणी बसून होती . चमच्याशी खेळणं नाही, ईकडे तिकडे धावणं नाही , शांत म्हणजे शांत. मग मलाच राहवेना.म्हटलं," स्वरा बरी आहेस ना ?" तेव्हा तिचं फक्त स्मितहास्य आणि "हो " हे उत्तर. मग ३० मिनिटं उलटली , तरी ती शांत. मांडीवर घे असे छोटे हट्ट सुरु झाले होतें , पण फारसं काही नाही .
आता मात्र पपेर ची 'बेल' झाली म्हणजे ,'बिल ' घेऊन वेटर आला .
निघता निघता " स्वरा शांत होती ह्याचा आनंद कि स्वरा शांत का होती " ह्याचा विचार करावा हेच कळत नव्हतं.
#स्वरा_किती_मस्ती_करतेस
#स्वरा_किती_शांत_आहेस
#स्वरा_करे_तो_क्या_करे

Tuesday, October 2, 2018
कोण कोणाची आई
प्रसंग १
लेकीला माझ्या बहिणीने गुजरातहून चनिया चोळी आणली. मी लेकीला मस्करीने विचारलं ," स्वरा मी अशी चनिया चोली आणू का ?"
ती म्हणाली नको.
मी का नको असं विचारल्यावर, डोळे मोठे करुन, थोडा आवाज उंचावून लेक म्हणाली "मी सांगते ते ऐक , का म्हणून विचारू नकोस"
प्रसंग २ -
"मी हिला सांगितलं , नख काप, वाढली आहेत नखं तुझी, ऐकतच नाही माझं "
हे वाक्य माझी लेक मला म्हणाली.
आजच्यापुरते लेकीकडून झालेलें अपमान बस. :)
कोण कोणाची आई हा मला हल्ली नेहमीच पडलेला
प्रश्न आहे .
#लेकमाझीशिक्षक

Sunday, September 23, 2018
वडाळा GSB गणपती
"पोवळ्याची माळ आणि हिऱ्याची कुडी असणाऱ्या बायकांनाच प्रवेश" असं लिहिलं तरी चालेल वडाळा GSB गणपती मंडळाने. मी जन्माने GSB , म्हणजेच माहेरची GSB . GSB लोकांचे मुंबईतले दोन मोठे गणपती म्हणजे वडाळा आणि किंग्जसर्कल . वडाळा GSB माझ्या घरापासून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर. कामाच्या व्यापामुळे इतका बाजूला असूनही मी तो गणपती काल म्हणजे चक्क दहाव्या दिवशी बघायला गेले. सिल्कच्या साड्या , अगदी बाजू -बाजूला असलेल्या मोठ्या पोवळ्यांची माळ, हिऱ्याची कुडी ही तिकडे येणाऱ्या बायकांची वैशिट्ये . पंजाबी ड्रेस मधे किंवा जीन्स मधे येणाऱ्या बायका अगदी हातावर मोजण्यासारख्या असतात. आपण पोवळ नाही घातलं तर अगदी out of place वाटेल म्हणून मी सुद्धा माझी अगदी बारीक पोवळ्यांची माळ आणि हिऱ्याची कुडी घालून गेले होते . म्हणजे पापलेट नाही तर मांदेली तरी आहे मासे म्हणून म्हणायला तसंच कांहीतरी . काल गणपती बघयला खुप गर्दी नव्हती . प्रवेश केल्यापासून दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत अर्धा तास सुद्धा लागला नाही . जातांना नैवेद्याचा १०० रुपयांचं ताट घेतलं. नारळ, केळी , फुलं असं त्या ताटात होत. ते ताट घेउन गणपती दर्शनाला गेलो. सोन्याने मढलेला गणपती हे त्याचं वैशिट्य .गणपती अगदी सुंदर दिसत होता. वातावरण फार प्रसन्न होत. दर्शन झाल्यावर प्रसादाचं ताट घेउन आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताक्षणी तो ताटातला प्रसाद कापडी पिशवीत घालुन आम्हाला देण्यात आला .मग आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो. तिकडे कटलेट, केळा भजी , कचोरी असे वेगवेगळे पदार्थ मिळतात. पदार्थ अगदी गरमागरम आणि चविष्ट असतात . रोज जेवणाचा प्रसाद असतो...मी अजून प्रसादाचं जेवण जेवलेले नाही पण तो स्वयंपाक इतक्या मोठ्या प्रमाणात होतो ह्याचा प्रत्यय तिकडे चिरताना बसलेल्या लोकांकडे बघून येतो ..भरपूर मोठे टोप भरलेले अळू, असंख्य नारळ असं चिरताना आचारी दिसतात. गजरे , हार बनवताना बायका दिसतात. खऱ्या अर्थाने भक्त देवाची सेवा करताना दिसतात. कोण मोठं नाही कोण छोटा नाही , सगळे फक्त भक्त. हे बघितल्यावर खुप छान वाटतं .
गणपती बाप्पा मोरया!
-dhanashree
Https://dsaidso.blogspot.com
Saturday, September 15, 2018
Jab I met Shahrukh Khan
"Is it really true?" I thought. "Am I really meeting SRK?" But yes it was true. I got to meet SRK and witness the shoot of BYJUs latest ad thanks to my husband. SRK was literally not even 100 metres away from me during the shooting. But given the rules and the silence that is to be maintained, we were not allowed to meet him during the shooting. We could just watch from a distance. I spent almost 8 hours at the recording studio. Of which watching Shahrukh was hardly for a few hrs. Rest of the time being spent in SRK getting ready and makeup for the various looks. Even in that little time, SRK was a true entertainer. Watching a take and retake of the same ad multiple times was enjoyable only due to Shahrukh.
Finally the moment came. As Gauri Shinde announced "Pack up", SRK proceeded to move out. The people around (mostly from BYJUs) who were watching him from a distance thronged him. People had got DDLJ posters to get his autograph and all. His bodyguards tried to keep people away as they circled around him. I had a notebook in my hand which contained a collection of my poems in 3 languages written for him. The bodyguards thought I was taking his autograph and wanted to drive me away. I just managed a minute to talk to him and told him this is my gift of multilingual poems for him. He opened the notebook, saw my name there and asked "Dhanashree, can I take this?" I still find this absolutely unbelievable. I didn't tell him my name, he opened the notebook while his bodyguards shooed me away, and thanked me. And just in that moment, my husband managed to click a pic. I did not have the time to buy a fancy greeting card, or a fancy notebook, all I had is good content in my usual notebook. That I could give it to SRK and receive his thanks is something I will remember for a lifetime. The collection of my poems for SRK is as follows -
मन्नत
एक मन्नत मांगी थी खुदा से मैने
कभी मन्नत में रेहनेवाले बादशाह से मिला हमें
कहा खुदा ने थोडा सब्र करो
परदेस के मॅडम tussads वाले बादशहा से पहले मिलो
एक wax statue को बस हम देख सकते हैं
SRK बनने का फॉर्म्युला थोडी पूछ सकते हैं
'कभी ख़ुशी कभी गम ' मे वक्त निकल गया
' चलते चलते ' एक 'चमत्कार ' हो गया
बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते होती हैं
और कभी छोटे छोटे लोगों की बडी बडी ख्वाईशें पूरी होती हैं
हम एक बार जीते हैं एक बार मरते हैं और एक बार King Khan से मिलने की तमन्ना रखते हैं
बॉलीवूड के बादशाह से मिलने का मौका आया
एक दिन हम उनसे मिल पायेंगे
ये मैने सोचा न था
मैने सोचा न था
Leadership
To imagine, To dream, To believe
To change ways and embrace the new
To be unafraid and not fear failure
To be passionate about goals, far and near
To inspire the team to move ahead
And be welcoming and inclusive of ideas that come ahead
Having the diligence to execute
And striking a balance between delegation and 'know it all' attitude
To have a plan to achieve the team goals
And yet accept the uncertainties that come in due course
Let the goals not be limiting
But be the milestones to achieve higher
This is what Leadership is all about
As per IIMBUEspeech by SRK , " naam toh suna hi Hoga"
[This poem is based on Shahrukh khan's speech at IIMBUE, the IIMB leadership summit]
Life Lessons
If you want to do something, do it really well
Put in your full effort, do with full JOSH, SRK tells
Maybe put in a bit of madness to your efforts
Taking your aberrations along, be a 'Deewana' of reaching your destination
Maybe you may fail,sometimes life may be bad
Have faith, have hope
Continue your efforts, you will get the 'Chamatkaar' results in due course
Let 'fear' not intimidate you
Let 'failures' not deter you
The real 'Baazigar' wins even after failures
Chooses not to be held back by his 'Darr' here
It's ok to be confused
It's ok to be worried
"Kabhi Haa, Kabhi Na"
Let life move at its own pace
In all this, be kind, try helping others
Do everything 'Dil Se' spread love to others
Take happiness and sadness in its ephemeral spirit
Live in the present, because you know 'Kal Ho Naa Ho'
Everything will eventually be ok in the end
If it's not ok, it's not the end
Because ' Picture abhi baaki hain doston'
[ Above poem based on Shahrukh Khan's speech at University of Edinburgh]
From your 'Fan'
I thought it was a 'Chamatkaar'
Am I really meeting 'King Khan'?
The 'Deewana' we grew up seeing
Or the 'Baazigar' we watched as kids
The epitome of acting excellence
The Badshaah of Bollywood
Who spans across generations
From 'Ye kaali kaali aankhen' to 'Lungi Dance' hereto
Absolutely thrilled to meet you
My name is Dhanashree, and I am your 'Fan,'
Bas Aapne naam Nahi suna Hoga..
कोण आहे शाहरुख?
कोण आहे शाहरुख, लेकीने मला विचारलं
तो लुंगी डान्स करतो तोच काय गं , तिने खात्री करु घेतलं
तो टी . व्ही . वर पिक्चर मध्ये कसा येतो ? हा तिचा पुढचा प्रश्न
त्याचं ऑफिस तेच का , हे तिचं न संपणारं विचारणं
३ वर्षाच्या लेकीला अजून काय सांगावं
' किंग खान ' किंवा 'बादशाह' म्हणजे काय , हे तिला कस उमगाव
शाहरुख म्हणजे खूप अभ्यासू विद्यार्थी
acting आणि dance यांचा सतत अभ्यास करणारा निश्चयी आणि मेहनती विद्यार्थी
प्रत्येक चित्रपटात त्याचा जोमाने परफॉर्मन्स देणं
प्रेक्षकांना आनंदी करणं हाच त्याचा एकाची धर्म
हसत खेळत जगावे, हाच त्याचा मंत्र
"जिंदगी नफरत के लिये बहुत कम होती हैं ", हाच त्याचा कानमंत्र
शाहरुख म्हणजे शाहरुख म्हणजे शाहरुख आहे
त्याच्या कर्तृत्वामुळे तो बॉलीवूडचा सुपरस्टार आहे
-Dhanashree Joglekar
https://dsaidso.blogspot.com
Monday, September 10, 2018
कॉपी आणि फुकटचं श्रेय
मी आद्या या ब्रँडचे दागिने वापरते. त्या ब्रॅण्डची अगदी तंतोतंत कॉपी होतेय त्याबद्दलची ही पोस्ट आहे - ( https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156836054896165&id=615421164) खरं सांगायचं तर काही काम न करता त्या कामाचं श्रेय घेणाऱ्यांची संख्या इतकी वाढलीय की त्यांबद्दल काय लिहू तितकं कमी आहे . पण तरीही ही पोस्ट वाचल्यानंतर काहीतरी लिहावसं वाटलं.
बाबूजींनी म्हटल्याप्रमाणे " कष्टवीन फळ ना मिळते " संस्कारात मी वाढले. आपण प्रामाणिकपणे कर्तव्य करावं , अगदी मन लावून काम करावं , मग यश येतच असे घरी संस्कार होते . दिखावा किंवा "शोबाजी"नव्हतीच . लोकांना दाखवायला पाहुणे आल्यावर अगदी साग्रसंगीत स्वयंपाक आणि इतर वेळी मुलांना नुसता वरण भात असं "शोबजी" प्रकरण नव्हतं .
शॉर्टकट हा प्रकारच मला माहित नव्हता .
" तुमचं बाबा बरं आहे , तुम्हांला १० रुपये अजून द्यायला काय झालं?" असं आजकाल रिक्षावाले म्हणताना दिसतात. माझं यावर एवढंच म्हणणं आहे , १० रुपये फुकट मिळवण्याचा ध्यास का ? का नाही अजुन कष्ट करुन मिळवत १० रुपये? हा १० रुपयांचा प्रश्न नसून तत्वाचा प्रश्न आहे . असं फुकटचे पैसे खाताना लाज कशी नाही वाटत? जनाची नाही तर मनाची तरी लाज कशी नाही वाटत? share केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे "मग का अडकताय त्याच त्याच गोष्टीत ? नवनिर्मितीचा ध्यास नाही का जराही ?आपण स्वतः काही न करता फोटो सुद्धा copy करायचे , ध्येय काय आहे बरं ? ध्येय जाऊदे , काही संस्कार ?" खरंच यातून संस्कार दिसतात .
आधी कॉपी , फुकटच मोठेपणा घेणार्यांची खुप चीड यायची. आता तसं काहीच वाटत नाही . गाढवाशी आणि आपलं तेच खरं करणाऱ्या माणसाशी काय बोलावं ? कारण अशी माणसं हजार खोटं बोलून " मी निप्पाणीचा ताम्भाकुचा व्यापारी लखोबा लोखंडे आणि तो मी नव्हेच " असं म्हणणाऱ्यातलीच असतात.

Sunday, June 24, 2018
My write up in Loksatta
Loksatta , the marathi daily of the Indian Express Group had invited writeups on the occasion of Father's day. I.had submitted one and it got published( the shorter version of it I mean). Sharing the same. It talks of how my father helped me right from the start and even after my marriage when I moved cities, houses and even in looking after my daughter.
It is published in page 4 of chaturang, the Saturday supplement of Loksatta.
They published a section of my write up. Some more part of my write up as follows
"स्त्री पुरुष समानतेबद्दल आपण बोलतो- ऐकतो, बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं याबद्दल चर्चा होत असतातच.माझ्या बाबांचा माझ्या पायावर उभा राहण्यात सिंहाचा वाटा आहे, लहानपणी अभ्यास घेण्यापासून , IIM ला MBA करताना मार्गदर्शन ,ते स्वराला संभाळण्यापर्यंत, आणि तो तसाच राहणार आहे. खरंतर आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, हा विश्वासच खूप स्फूर्ती देऊन जातो. त्या खात्रीनेच मानसिक बळ येतं , खूप काही नवीन करण्याची ऊर्जा येते. त्यामुळेच आज मी नोकरीबरोबरच नियमितपणे ब्लॉगवर लिहिते, निबंध - वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेते. मी बाबांबरोबर भौतिक प्रवास किती केला हे आठवत नाही, पण आयुष्याच्या प्रवासात ते सतत माझ्या सोबत होते, अगदी कितीही चढ ऊतार आले तरी.
माधुरी दीक्षित च्या हल्लीच्या बकेटलिस्ट या चित्रपटात " होऊन जाऊ द्या " या गाण्यातले हे शब्द आहेत " वाटेवरी जरी काटे किती तरी ,तुला फिकीर ना कशाची भीती" . मला माझ्या आयुष्यातल्या स्वप्नांची बकेटलिस्ट कितीही काटे असले तरी कशाची भीती न बाळगता पूर्ण करण्यासाठी पाठीशी उभ्या असणाऱ्या बाबांना "हैप्पी फादर्स डे ". त्यांच्यामुळेच मी कुठल्याही कठीण प्रसंगाला "होऊन जाऊ द्या" असं म्हणत कणखरपणे सामोरी जाऊ शकते
"
-Dhanashree
https://dsaidso.blogspot.com
Tuesday, June 19, 2018
मी एक पास / नापास आई ?
स्वरा - " आई मला टिकली लाव न गं "
मी बॅगेतुन एक टिकलीचं पाकीट काढून त्यातली एक टिकली तिला लावली.
स्वरा - " आई , ही नको , ती शुभांगी सारखी टिकली लाव न गं "
मी - " अगं कोण ही शुभांगी , आता ही टिकली लाव न "
स्वरा - " अगं ती शुभांगी , ती टी . व्ही वर असते ती , ती मोठी टिकली लावते ती "
अरेच्चा , माझ्या आत्ता लक्षात आलं, ती शुभांगी गोखलेंबद्दल म्हणत होती .मागे श्रीयुत गंगाधर टिपरे यांचे जुने एपिसोड्स बघताना ती शामल म्हणजे शुभांगी असं मी म्हणाले होते .
तर असो . गेले दोन दिवस मी "शुभांगी " टिकली आणायला विसरतेय . आज घरी जाताना मी नेली म्हणजे पुरे. नाहीतर मला प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं जावं लागेल..
" आई तू टिकली का नाही आणलीस ?
आई तू का विसरलीस?
आई आता जाऊया का आणायला?
आता का नकॊ जाऊया आणायला? "
या आणि अशा अनेक प्रश्नांना घरी पाय ठेवताक्षणी उत्तर देताना हे प्रश्न मला कुठल्याही बोर्डच्या परीक्षेपेक्षा नकोसे वाटतात. यात आपण नापास होण्याचीच शक्यता जास्त.
हाच विचार करता करता आपलं बालपण आठवतं. आपणही आपल्या आईला अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यायला लावली होती. आता स्वतः आई झाल्यावर ते किती कठीण होतं ते कळलं.
पु ल एकदा एका कथेत म्हणाले होते - "मी एक नापास आजोबा"
आता मला वाटतं मी एक आईपणात नापास होण्याची भीती बाळगणारी आणि पास होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी आई आहे .
आणि हो आईपणात पास झालेल्या आयांना माझा सलाम!
#dsaidso #marathi

Thursday, June 7, 2018
हैप्पी बर्थडे सायली राजाध्यक्ष
सायली राजाध्यक्ष या फूड आणि lifestyle ब्लॉगर यांना मी follow करते. मला त्यांच्या लिखाणातला खरेपणा , स्पष्टपणा आणि अर्थातच महिती खूप आवडते .त्यांचा आज वाढदिवस आहे . त्याबद्दल एक कविता
कानडी बोलणाऱ्या राज्यात मराठी ऐकणं तसं दुर्मिळच
कोणीतरी गप्पा मारायला हवंय मराठीत ही इच्छा सदैव होती मनात
कोणीतरी गप्पा मारायला हवंय मराठीत ही इच्छा सदैव होती मनात
लोणचं महोत्सवामुळे झाली तुमची ओळख
गप्पा मरायला तुमच्या ब्लॉगपोस्ट यांची होती मला सोबत
गप्पा मरायला तुमच्या ब्लॉगपोस्ट यांची होती मला सोबत
कधी रोजच्या स्वयंपाकाबद्दल गप्पा
तर कधी साध्या झटपट पदार्थांबद्दल
कधी स्वयंपाकाचं नियोजन तर कधी स्वयंपाकाचं ललित
या गप्पांमुळे झटपट काही मस्त स्वयंपाक शिकले मी खरा
तर कधी साध्या झटपट पदार्थांबद्दल
कधी स्वयंपाकाचं नियोजन तर कधी स्वयंपाकाचं ललित
या गप्पांमुळे झटपट काही मस्त स्वयंपाक शिकले मी खरा
कधी विस्तृत माहिती असणारी प्रवासवर्णन
कधी देश परदेशी असलेल्या लेखकांनी लिहिलेले लेख यांच संपादन
कधी देश परदेशी असलेल्या लेखकांनी लिहिलेले लेख यांच संपादन
साड्यांच्या गप्पा जणू आम्हाला एक शॉपिंग मॉल मध्ये नेतात
फॅशन करण्याचे नवे आणि सोपे मार्ग सुचवतात
फॅशन करण्याचे नवे आणि सोपे मार्ग सुचवतात
तुमच्या लिहिण्यातला स्पष्टपणा आणि खरेपणा भावला
जे आहे ते अगदी तसंच सुंदररित्या मांडण्याचा तुमचा धाडस भावला
जे आहे ते अगदी तसंच सुंदररित्या मांडण्याचा तुमचा धाडस भावला
तुमचा ब्लॉग वाचून लिहिण्यास येते स्फूर्ती
रेसिपीस करून पाहिल्या तेव्हा नवऱ्याकडून मिळते शबासकी
रेसिपीस करून पाहिल्या तेव्हा नवऱ्याकडून मिळते शबासकी
तुमचा ब्लॉग वाचून मिळणाऱ्या आनंदाचं कांही मोजमाप नाही
हैप्पी बर्थडे म्हणून तुमच्या ऋणात मी सदैव रहाणं पसंत करीन
हैप्पी बर्थडे म्हणून तुमच्या ऋणात मी सदैव रहाणं पसंत करीन
You can read Sayali Rajadhyaksha blog here -https://shecooksathome.com
https://sareesandotherstories.blog
https://sareesandotherstories.blog
-DHANASHREE
Sunday, May 13, 2018
बाम काका- आठवणी
क्रीडा मानसतज्ञ कै भीष्मराज बाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काही आठवणी . ते माझ्या आजीच्या बिल्डिंगमध्ये राहायचे.
“आपल्या वरती पोलीस राहतात ना ते आता येणार आहेत आपल्याकडे " माझी मावशी मला म्हणाली. मी तेव्हा दुसरीत होते. त्यावेळी मनात पोलिसांची प्रतिमा म्हणजे काय - तर शेवाळी युनिफॉर्म, धिप्पाड बांधा , मोठी मिशी,मोठे डोळे अशी होती. थोडक्यात काय तर थोडीशी भितीदायक प्रतिमाच होती . त्यामुळे त्यांना भेटणे टाळायचे म्हणून मी आतल्या बेडरूम मध्ये जाऊन बसले. "अगं बाम साहेब आले आहेत ग, बाहेर ये सोन्या" असं माझी मावशी म्हणाली. मला बाहेर जायचं नव्हतं. म्हणून मी आतच बसून होते. बघते तर काय, मी बाहेर येत नाही म्हणून बाम काका आत आले. अशा प्रसन्न निर्मळ चेहऱ्याचे पोलीस असतात हे मला तेव्हा पहिल्यांदाच कळलं . खरं सांगायचं तर दिसण्यावर तसं काहीच नसतं , पण लहान वयात प्रथमदर्शनी जर कोणाची थोडी भितीदायक प्रतिमा झाली की त्या माणसाकडे जायला भिती वाटते एवढंच . बाम काका आणि काकी त्यादिवशी माझ्याशी अगदी आपुलकीने बोलले. तेव्हापासून आपल्या आजीच्या बिल्डिंगमध्ये पोलीस राहतात याची भिती वाटण्यापेक्षा, अभिमान वाटला . बाम काका IPS Officer होते. निवृत्त होताना ते IGP - Inspector General of Police म्हणून निवृत्त झाले. ते एवढ्या मोठ्या पदावर होते याची त्यांनी कधीही जाणीव करून दिली नाही. आम्हाला ते माहित होतं , पण त्यांनी त्यांच्या वागण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं नाही. नुसतं त्यांच्या नाही , तर बाम काकींच्या किंवा त्यांच्या मुलांच्या वागण्यातून, बोलण्यातून ते आम्हाला कधीच जाणवलं नाही. अगदी down to earth वागणूक होती त्या सगळ्यांची .
एकदा माझी मावशी त्यांच्याकडे गेली होती, तेव्हा तिने बघितलं की सचिन तेंडुलकर आला होता त्यांच्याकडे . त्यानंतर आम्हाला कळलं की ते एक प्रख्यात sports psychologist आहेत. त्यांच्याकडे मोठमोठे खेळाडू Counselling साठी यायचे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अंजली वेदपाठक आणि असे अनेक. नुसते खेळाडू नाही तर मोठमोठे surgeon मोठं ऑपेरेशन करण्याच्याआधी त्यांच्याकडे counselling साठी यायचे. मी स्वतः सुद्धा त्यांच्याकडे MBA प्रवेश परीक्षेच्याआधी मार्गदर्शनासाठी गेले होते. ते yoga , प्राणायाम करण्यावर खूप भर द्यायचे. tennis /badminton असा एखादा प्रत्येक shot ला decision making लागणारा खेळ खेळावा असं ते म्हणायचे. शिकत असताना त्यांना बऱ्याच वेळा भेटण्याचा योग्य आला. तेव्हा ते निवृत्त झाले होते आणि निवृत्तीनंतर ते नाशिकला राहायला गेले. तरी त्यांचं मुंबईला बऱ्यापैकी येणं- जाणं होतं . आम्हाला त्यांनी नाशिकला येण्याचं बऱ्याचदा आग्रहाने निमंत्रण दिलं होतं . तिथे त्यांचा व्याप बराच मोठा होता . IAS साठी तयारी करण्याचं मार्गदर्शन करायचं , लेक्चर , counselling हे सगळं चालूच होतं . तरीही जेव्हा ते मुंबईला यायचे तेव्हा माझ्या मावशीला " राणी कशी आहेस" असं विचारल्याशिवाय जायचेच नाहीत. माझ्या मावशीला त्यांचा खूप आधार वाटायचा .

गेल्यावर्षी बाम काकांचं लेक्चर मध्ये असताना निधन झालं . आपली आवडती गोष्ट करतानाच त्यांची प्राणज्योत मावळली . गेल्यावर्षी ही बातमी ऐकल्यावर खूप वाईट वाटलं. आधी विश्वासच बसत नव्हता. आज त्या गोष्टीला एक वर्ष झालयं. त्यानिमित्ताने हे लिहावंसं वाटलं . बाम काका एवढ्या मोठ्या पदावर होते ह्याच्यापेक्षा त्यांच्या वागणुकीमुळे ते आम्हाला सदैव लक्षात राहतील. माणसाची किंमत त्याच्या श्रीमंतीमुळे, मोठ्या घरामुळे किंवा अजून कशामुळे नसून त्याच्या माणुसकीमुळेच ठरते. निदान माझ्यासाठी तरी!
Thursday, April 19, 2018
चहा चपाती
आज सकाळचा नाश्ता झाला का? हा प्रश्न मी हल्लीच ऐकला असेल. लहानपणापासून माझ्या आईकडे “ आज सकाळची चपाती खाऊन झाली का?” हाच प्रश्न असायचा. चहा आणि चपाती हे जणू काही माझं सकाळचं खाणं. अगदी कितीही लवकर बाहेर पडायचं असेल तरी चहा आणि चपाती खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. माझे जेव्हा सकाळचे क्लास असायचे तेव्हा मी अगदी सकाळी ५:३० ला गरम चपाती आणि चहा असं खाऊन जायचे. चहा आणि चपाती खाण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. काहींना चहाच्या कपात थोडीशी चपाती बुडवून खायला आवडते. काहींना चहा बशीत ओतून त्यात चपाती बुडवून खायला आवडते. काहींना चहा बशीत ओतून त्यात चपाती अगदी पूर्णपणे बुडवून खायला आवडते. आणि हो मग तो चहा त्या बशीतून प्यायला आवडतो, त्यात म्हणे चपातीची चव उतरते आणि तो चहा अजून चवदार लागतो. बऱ्याच लोकांना सकाळी पोळी भाजी / चपाती भाजी खाण्याची सवय असते.त्यांना जेव्हा मी चहा चपाती खाते असं सांगते तेव्हा त्यांना असं चहा चपाती काय खातात ह्याचं नवल वाटतं . आणि माझ्यामते हल्ली जसे cornflakes, wheatflakes खातात, ते पण दुधात बुडवून खातात ना, तर हे तर चहात ताजी ताजी चपाती बुडवून खाणं झालं. Fresh is best नाही का? ही चहा चपाती खाण्याची पद्धत कुठली हे मला ठामपणे माहित नाही. पण कोकणात बालपण गेलेल्या लोकांची ही सवय असावी असं माझं निरीक्षण सांगतं. माझा संपर्क असं खाणाऱ्या कोकणातल्या सारस्वत लोकांशी जास्त आहे ( ह्यात कसलाही जातीयवाद नाही).
माझ्या घरी आता सकाळचा नाश्ता असतो- जसं कि इडली, डोसा , उपमा. मला हे सगळे पदार्थ आवडतातच. पण माझं सकाळचं comfort food चहा चपाती आहे. माझ्या घरी चपातीला पोळी म्हणतात . मी पण पोळी म्हणते. पण चहा पोळी म्हणण्यापेक्षा चहा चपाती म्हणण्यात मज्जा आहे. आणि हो बोलण्यापेक्षा मी करण्याला महत्व देते
-धनश्री
Sunday, February 25, 2018
आठवणीतले उखाणे
एक जुनी वही सापडली. आणि त्या वहीत काही सुंदर आठवणी सापडल्या. आमच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे २०१३ साली लिहिलेले उखाणे त्या वहीत होते. ते आता share करतेय.
iPad वर उडतो angry birds चा थवा
सिद्धेशचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
सिद्धेशचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
Apple च्या macbook वर फुलं वाहते वेचून
सिद्धेशचं नाव घेते सर्वांचा मान राखून
सिद्धेशचं नाव घेते सर्वांचा मान राखून
गणेशाला आवडतात दुर्वा शंकराला बेल
सिद्धेशसंगे फुलावी सुखी संसाराची वेल
सिद्धेशसंगे फुलावी सुखी संसाराची वेल
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण
शिरोडकरांची कन्या झाली जोगळेकरांची सून
शिरोडकरांची कन्या झाली जोगळेकरांची सून
चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून
सिद्धेशचं नाव घेते आग्रह केला म्हणून
सिद्धेशचं नाव घेते आग्रह केला म्हणून
-धनश्री
Subscribe to:
Posts (Atom)
Faith
She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...
-
She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...
-
What exactly is winning? How do you cultivate the right mindset so that you turn out to be a champion, not merely a winner? How do you exp...