Wednesday, April 26, 2023

उत्सव जगण्याचा


गोडं वरण भात त्यावर तुपाची धार
आजीच्या गोधडीचा उबदार सहवास
चैत्रातील हळदीकुंकू आंबेडाळ खात
आमरस पुरीच्या पंगती लग्न सोहळयात
उत्सव जगण्याचा साजरा करूया आज

पहिला पाऊस आणि मातीचा सुवास
कांदा भाजी खात आनंद लुटूया आज
श्रावणात हिरवळ सगळीकडे बहारदार
येतीलच आता गणपती बाप्पा घरात
उत्सव जगण्याचा साजरा करूया आज

आपट्याची पानं देऊया दसऱ्यात
लाडू चकली खाऊन दिवाळी साजरी करूया दणक्यात
भेटूया भावंडांना करूया धमाल
उत्सव जगण्याचा साजरा करूया आज

संक्रांतीला गुळपोळी होळीला पुरणाची पोळी
खाण्यापिण्याचे वैविध्य ही आपल्या संस्कृतीची देणी
लहान थोरांसोबत राहूया सुखदुःखात एक
सण असो व आजारपण आपलं कुटुंब राहील एकीने
उत्सव जगण्याचा साजरा करूया नेहेमीप्रमाणे 

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...