फेसबुक या माध्यमातूंन खूप छान छान ब्लॉग्जर्सचे लिखाण वाचायला मिळाले. Tejal Krishnakumar Raut आणि Himali Kokate यांची मी एक अशीच फेसबुक follower . त्यांच्या #माझं_काम_माझा_अभिमान या सदरासाठी माझी story share करतेय --
माझा जन्म मुंबईत एक मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. खाऊन , पिऊन सुखी म्हणतात अशा कुटुंबात. घरी आई , बाबा , आत्या, आजी आणि आम्ही दोन भावंडं. वरच्या मजल्यावर राहणारी मोठी आत्या आणि शिल्पा ताई.आम्ही लहान असताना आजी, आत्यानेच सांभाळलं . कधी बाहेर राहण्याची, किंवा घरी मदतनिसांच्या हाताखाली वाढण्याची पाळी आली नाही. शाळेत जाताना आजी जेवण द्यायची आणि घरी आल्यावर आत्या गरम चहा करून ठेवायची. शनिवारी शाळेतून आल्यावर आई काहीतरी special करायची. घरात अभ्यासाला खूप महत्त्व . पहिला अभ्यास , आणि मग सारं काही. बाबाचं तत्त्व - तुला जे काय करायचंय ते कर, पण अगदी मन लावून कर, अगदी top येण्याचं ध्येय ठेवूनच कर. घरात वैचारिक, अभ्यासू वातावरण. बाबांच पेपर वाचन, आई- आत्या चा कोडी सोडवणं इत्यादी.
माझी ताई माझ्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी. मी शाळेत असताना ती मेडिकलला होती . MBBS झाल्यानंतर MD साठी कुठली फील्ड निवडायची यासाठी फॉर्म भरणं चालू होतं . तेव्हा मला माझ्या आजीचे शब्द आठवतात " तुका जा करुचा ता कर , पण नोकरी कर. आपण आपल्या पायावर उभ्या रवाक होया . पगार कितीही असुंदेत , पण नोकरी होई ". मी ज्या वातावरणात वाढले तिथे खरंतर मुलींनी नोकरी न करणं हा option नव्हताच. [ तेजल च्या मागच्या पोस्टमध्ये ती हे म्हणालेली तसं काहीतरी ] आई, आत्या, मावशी, मामी, काकी सगळ्याच नोकरी करायच्या किव्वा full - time ट्युशन्स तरी .
माझा शाळेत नेहेमी पहिला नंबर असायचा . १० वी नंतर science आणि मग VJTI मधून IT engineering केलं . इंजिनीरिंग मध्ये सुद्धा टॉप ३ मध्ये होते. कॅम्पस प्लेसमेंट through Lehman Brothers या त्या काळच्या (२००८) Top 5 investment banks मध्ये सिलेक्ट झाले.तेव्हा नोकरी करताना माझ्यावर कोणाची जबाबदारी नव्हती. आई बाबा आर्थिक रित्या independent होते, आणि कोणाची caring जबाबदारी पण नव्हती.त्यामुळे फक्त काम , वाचन आणि मी असं चालू होतं . पहिल्या नोकरीने मला एक professional confidence दिला. ही नोकरी करत असतानाच MBA साठी लागणाऱ्या CAT entrance exam ची तयारी करत होते. २००९ साली खूप तयारी करून CAT दिली पण IIM call नाही आला. MBA करायचं तर IIM A, B , C मधूनच असं मी ठरवलंच होतं . त्यामुळेच कदाचित मला FMS मधून admit मिळूनही मी तिथे जॉईन केलं नाही . त्यावेळी मी TIME coaching इन्स्टिटयूट मधल्या मंदार सरांशी आणि Arkss सरांशी बोलल्याचं आठवतंय. मी अजून एक attempt दिली तर मला IIM मिळेल असा त्यांचा विश्वास होता. मी २०१० ला परत CAT द्यायचा ठरवलं. पण त्यावेळी मी न pressure घेता CAT दिली .No intense practice. Result day ला मी रिझल्टही बघितला नाही. शेवटी बाबांनी दोन दिवसांनी मेल open केली.
(To be continued)
क्रमशः -भाग १
-धनश्री
No comments:
Post a Comment