Wednesday, January 27, 2021

माझं_काम_माझा_अभिमान - भाग २

 #माझं_काम_माझा_अभिमान  

Tejal Krishnakumar Raut Himali Kokate

भाग २

ई - मेल बघितल्यावर बाबा म्हणाले - मला IIM - Bangalore कडून interview कॉल आला होता. त्यात essay writing आणि interview असे दोन भाग होते. interview साधारण दीड महिन्यांनी होता. interview च्या तयारीला लागले. खूप वाचन  चालू होतं . एक मात्र पक्क ठरवलं होत-  " I will not worry about how I should present myself to be an eligible IIM B candidate in the interview. Instead I will just be myself and present my true authentic self" . माझा interview खूप  छान झाला.  interview झाल्यानंतर ऍडमिशन मिळेल कि नाही याचा फार विचार केला नाही. यावेळी मी बरीच detached होते. Give your best and leave the rest to god- याला  मी तंतोतंत follow करत होते. गेल्यावर्षीच्या CAT च्या अपयशानंतर मला खूप वाईट वाटलं होत. त्यामुळे यावेळी मी फक्त माझ्या हातात जे आहे त्यावर फोकस करायचं ठरवलं होतं. एप्रिलमध्ये final result लागला.

April 19 was the day. And the email read - "Congratulations! We are pleased to inform you that, you are offered admission to the Post Graduate Programme in Management 2011-13 batch at IIM Bangalore."

हे वाचून माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. An admit from IIM  - was this even real? But hey, it was !

आणि यानंतर माझा एक वेगळा प्रवास सुरु झाला. कधीही आई बाबांपासून दूर  न राहिलेली, IIMB मध्ये बंगलोरला हॉस्टेल मध्ये राहणार होते. IIMB चा अभ्यास, competition याचा विचार न करता , MBA मध्ये खूप कमी झोप मिळते त्यामुळे आपल्यासारख्या झोपावेड्या मुलीचं कसं होणार या विचारात मी होते.

IIMB मध्ये गेल्यावर लक्षात आलं कि इथे येणार प्रत्येक विद्यार्थी तत्याच्या कॉलेज, युनिव्हर्सिटीचं टॉपर होता. त्याशिवाय अनेक extra -curricular गोष्टीत प्राविण्य मिळवलेलं होतं .  बॅच मध्ये इतकी हुशार मुलं /मुली होते की Am I even good enough? हा प्रश्न मला नेहेमी पडायचा.

IIM च्या placement  interview मध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "Where do you see yourself 5 years from now?. खरं सांगायचं तर मनातलं उत्तर असायचं " ५ वर्ष पुढचं कुणी बघितलंय". पण बोलावं मात्र काहीतरी वेगळंच लागायचं . काय तेव्हा बोलले होते ते आठवत नाही पण "I will learn and grow even further in my field" या आशयाचं काहीतरी बोलले असेन.

पाच वर्षांनंतर म्हणजे २०१७-२०१८. होतं माझ्यासाठी.

2017-2018 साली माझ विश्व इतक बदलेल आणि इतक्या गोष्टी मी balance आणि prioritize करत  असेन याची मला अजिबात 2012-13 साली कल्पना नव्हती . हे सगळं करता करता मी खूप काही शिकले आणि मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू बघितले ...त्याबद्दल पुढच्या भागात 


(To be continued)

क्रमशः -भाग 2 

-धनश्री

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...