Wednesday, January 27, 2021

माझं_काम_माझा_अभिमान - भाग ३

 #माझं_काम_माझा_अभिमान

भाग ३ 

२०१३ ला मी IIMB मधून graduate झाले. Graduate झाल्यावर लगेच त्या वर्षीच्या मे महिन्यात माझं लग्न झालं. आमचं लव मॅरेज होतं. माझ्या नवऱ्याला , सिद्धेश ला मी लग्नाच्या आधीपासून ओळखत होते. मात्र आम्ही प्रत्यक्ष VJTI नंतर २-३ वेळाच भेटलो होतो.मे महिन्यात लग्न आणि जून महिन्यात मी आदित्य बिर्ला ग्रुप जॉईन केलं. यावेळी माझा संसार आणि नोकरी दोन्ही सुरू झालं. लग्नाआधी आई बाबांबरोबर राहिल्यामुळे संसाराची जबाबदारी माझ्यावर नव्हती.


२०१४ ला माझा Accenture Consulting चा इंटरव्ह्यू झाला. जेव्हा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर त्यांच्याकडून काही reply आला नाही. मग November ला कॉल आला final इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा मी 4 months pregnant होते. मी pregnant असताना मला कोण का  जॉब देईल असा मी विचार केला. पण तरीही मी इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूमध्ये मी माझ्या pregnancy बद्दल सांगितलं. मला Accenture तेव्हा recruit करेल असं वाटलं नव्हतं. पण Accenture ने माझी प्रोफाइल बघून मला job offer दिला.


२०१५ मे मध्ये मी पहिल्यांदा आई झाले- स्वरा ची आई. त्याच वर्षी माझ्या नवऱ्याला नोकरीसाठी बंगलोरला relocate करावं लागणार होत. ऑक्टोबर मध्ये तो relocate झाला आणि २०१६ January ला मलासुद्धा बंगलोर मध्ये प्रोजेक्ट मिळालं आणि मी सुद्धा तिकडे relocate झाले. तेव्हा माझा भाऊ तिकडे नोकरी करत होता आणि त्यामुळे त्याच्यासाठी माझे आई बाबा तिकडे होते. मला त्यावेळी आई बाबांच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट मिळाला. त्यामुळे माझा स्वराच्या सांभाळण्याचा प्रश्न सुटला. माझे आई बाबा आणि यापैकी कोणी मुंबईला येणार असेल तर आत्या स्वरा ची काळजी घेत होते.


२०१९ सप्टेंबर मध्ये मी परत एकदा आई झाले. आर्याचा जन्म झाला.२०१५ ते २०२० या काळात आम्ही अनेक घर बदलली. मुंबई ते बंगलोर आणि बंगलोर ते मुंबई अशी शहर ही बदलली. एक वर्ष long distance relationship मध्ये सुद्धा राहिले. 


करिअर करताना आणि दोन मुलींना वाढवताना, खूप अनुभव गाठीशी आले. या काळात आपली माणसं कोण याचा अनुभव आला. आपल्या हाताशी दोन मुली असताना, आपल्याला मदतीची गरज असताना काही लोक किती फालतू कारण निर्माण करून अडवून दाखवतात याचा अनुभव आला. जितक्या लोकांनी अडवून दाखवलं त्यापेक्षा कित्येक जास्त  छान माणसं भेटली. मुलींना वाढवताना त्यांच्यामुळेच काही कमी पडलं असं वाटलं नाही. 


माझ्या नोकरीमुळे एक छान दुसरं विश्व होतं- नोकरी केल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास होता. आपले पैसे आणि त्याचं स्वातंत्र्य ही एक वेगळीच चीज आहे. मी आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे नोकरी न करणं हा ऑप्शन मला माहीतच नव्हतं.माझ्या नोकरी मुळे मला financial freedom मिळालं. नोकरी आणि मुलींचं करताना आपण दोन्ही गोष्टींना न्याय देतोय ना असा विचार नेहेमी यायचा. पण तेव्हा माझा नवरा आणि आई बाबा मला नेहेमी मला motivate करत होते. नुसतं शब्दानेच नव्हे तर actively मदत करत होते. 


2020 ला एप्रिल मध्ये माझी दुसरी maternity leave संपणार होती. तेव्हाच lockdown सुरु झाला. त्यामुळे आता मुलींना सांभाळून घरकाम करून नोकरी कशी करता येईल हा विचार होता. आई बाबा मालाडला राहतात त्यामुळे ते दादरला lockdown मध्ये मदतीला येऊ शकत नव्हते. मी विचार केला - lets do it. जॉईन तरी होऊया आणि मग बघुया काय होतंय ते. मी जॉईन झाले. नवरा आणि मी  २ मुलींना सांभाळत , घरकाम करत, जेवण करून सगळं करत होतो. माझी जवळ राहणारी मावशी आम्हाला गरज लागल्यास अगदी घरपोच हव्या त्या वेळी सामान आणून देत होती, मदत करत होती. माझी मैत्रीण सुखदा मला घरपोच पोळी भाजी देत होती. नाश्ता, आमटी भात , रात्रीचा स्वयंपाक सगळं मी करत होते. २०२० हे वर्ष कसं निघून गेलं ते कळलंच नाही.काळ फार पटापट निघून जातो. आज माझी मोठी मुलगी साडेपाच वर्षांची आहे. 


माझी आजी नेहेमी म्हणायाची आपल्याकडे पैसे असले की सगळे आपल्याला देतात, पण नसले तर कोण मदतीला येत नाही. म्हणून नेहेमी स्वावलंबी असावं.   मी स्वावलंबी आहे , पण मी एकटीच सगळं करू शकत नाही. आज इथपर्यंतच्या प्रवासात सिद्धेश, आई बाबा‌ भाऊ,  आत्या ची साथ होती आणि ती पुढे सुद्धा राहीलच. मावशी ,भावंडं सुद्धा मदत करणारे आणि उगीचच  माझ्या संसारात ढवळाढवळ करणार असे नाहीत.  काही छान मैत्रिणी, family friends आहेत जे कधीही धावून येतील मदतीसाठी. 


 पैसा महत्त्वाचा की माणसं? दोन्ही महत्त्वाचं - आपली माणसं आपल्याबरोबर असतात पण त्याबरोबर पैसा हवाच. आणि त्यासाठी आपण स्वावलंबी हवच. There is no alternative. Atleast not for a girl like me.

पण एक मात्र नक्की माझ्या या प्रवासात जी छान साथ देणारी माणसं मिळालं त्यामुळे तो खूप सुखकर , enjoyable झाला. Three cheers to them!


समाप्त

No comments:

Post a Comment

Remembering Mehendale Kaka

 Mehendale kaka It was last Friday – I was travelling from work and I get a call from Baba – “Pradnya che baba - Mehendale kaka” passed away...