Tuesday, June 20, 2017

Happy Birthday, वीणा मावशी!

"झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया"
हे गाणं माझ्या मुलीला खूप आवडतं . हे गाणं मनात खूप आठवणी जागं करतं,आजोळच्या आठवणी . प्रत्येक सुट्टीत मी माझ्या आईसोबत आजोळी जायचे. माझ्या आजोळी माझे आजोबा,आजी , वीणा मावशी आणि राणी मावशी होते. कधीतरी माझ्या आईची काकू ( निंनी आजी ) आणि उमा मावशी यायचे. लहानपणापासून वीणा मावशी आमच्यासाठी भरपूर गिफ्ट्स आणायची.आवडीचा खाऊ आणायची. नंतर माझा भाऊ झाल्यावर ती दर शनिवारी आमच्या घरी यायची. माझ्या भावासाठी वेगवेगळी पुस्तकं आणायची. 
नुसत्या वस्तू आणल्या म्हणजे प्रेम व्यक्त होतं असं नाही. पण वीणा मावशी ज्या प्रेमाने आमच्यासाठी करायची ह्याला महत्त्व. कितीही पाहुणे आले तरी त्यांच्यासाठी कंटाळता चपात्या करायची. परत परत चहा विचारायची. वीणा मावशीचा ड्रेसीस आणि साड्यांचा चॉईस अगदी अफलातून आहे. माझे तर कित्येक पंजाबी ड्रेस " वीणा मावशी , मला हा तुझा ड्रेस आवडला" असं म्हटल्यावर मिळाले आहेत. आता वजन वाढल्यामुळे हे असे लाड झाले तरी परवडत नाहीत.

लहानपणी असं ऐकलं होतं, सांता (santa claus ) हा भरपूर भेटवस्तू देणारा एक व्यक्ती. माझ्या द्रुष्टीने वीणा मावशी हा आमचा सांता आहे. वीणा मावशीचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने ही पोस्ट आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...