"अजून थालीपीठ, थालीपीठ , थालीपीठ .. " असा गजर करत माझी मुलगी माझ्या मागे मागे आली. एक साबुदाण्याचे थालीपीठ नवऱ्याला वाढले होते. ते लेकीने खाल्ले , आणि ते संपत आले म्हणून हा गजर करत ती माझ्या मागे धावत आली. साबुदाणा थालीपीठ हा ब्राह्मणांचा अगदी लाडका पदार्थ. साबुदाणा थालीपीठ आणि दही दिलं कि माझ्या नवऱ्याचं रात्रीचं जेवण भागतं. मला मात्र अगदी सारस्वती पद्धत्तीप्रमाणे चपाती, भाजी, भात , आमटी , ताक / सोलकडी लागतं. अर्थातच या सगळ्या गोष्टी मला रोज बनवायला जमतात असं नाही. असो. मला आठवतं लहान असताना मी आईला विचारायचे " अगं आई, एवढ्या पुरणपोळ्या घरी का करतेस , विकत का नाही आणत?" तेव्हा आई म्हणायची ," घरचं ते घरचं ".. त्याचा अर्थ तेव्हा काही समजला नाही. पण आता उमगतोय. आपल्या माणसांसाठी खाऊ बनवणं, ह्याची मजा औरच.
" आई छान, मस्त "
असं जेव्हा माझी लेक म्हणते तेव्हा अगदी जीव तृप्त होतो. ती बक्षिसाची हाक फारच समाधान देते. आपण आपल्या लेकरासाठी त्याच्या आवडीचं करू शकलो हे समाधान वर्णनातीत नाही.
" आई छान, मस्त "
असं जेव्हा माझी लेक म्हणते तेव्हा अगदी जीव तृप्त होतो. ती बक्षिसाची हाक फारच समाधान देते. आपण आपल्या लेकरासाठी त्याच्या आवडीचं करू शकलो हे समाधान वर्णनातीत नाही.
No comments:
Post a Comment