एखादी व्यक्ती पटकन काहीतरी स्पष्टपणे बोलून जाते. समोरच्या व्यक्तीला काय हिची सारखी बडबड/कटकट असं वाटतं. पण खरं सांगायचं तर एखादी व्यक्ती असं का बोलली याचा कोणविचारचं करत नाही. समोरची व्यक्ती न बोलून काय राजकारण करत असेल हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे अशा व्यक्तीला कोणी स्पष्टपणे उत्तर दिलं तर बोलणारी व्यक्ती किती उद्धट आहे असा समज प्रथमदर्शनी होऊ शकतो. कामचुकार माणसाने काम नाही केलेले दिसत नाही, त्याला बोलणारे लोक मात्र वाईट ठरतात . कामाची टाळाटाळ करणं आणि " मी हे का नाही करणार, करेन गं ?" ही भावनिक सबब देत आपली बाजू सांगणं हे हल्ली इतक्यांदा दिसतं कि मला या मानसिकतेची कीव नं येऊन सवय झाली आहे.
-धनश्री
No comments:
Post a Comment