साल २०१३ - माझ्या लग्नाआधीची खरेदी चालू होती . साड्या खरेदी करुन झाल्या होत्या . आता ब्लाऊज शिवायला टाकायचे होते . मला स्वतःला मोठया गळ्याचे ब्लाऊज घालायला आवडत नाहीत . लोकांना ते छान दिसतात पण मला ते छान दिसत नाही असं मला वाटतं . त्यामुळे फॅशनच्या आहारी न जाता मी मला हवे तसे गळ्यांचे ब्लाऊज शिवून घेतले. ब्लाऊजच्या बाह्या मात्र फॅशनच्या आहारी जाऊन छोट्याच ठेवल्या. मला थोड्या लांब बाह्यांचे ब्लाऊज बरे दिसतील असं माझ्या घरच्यांचं मत होतं. पण मी मात्र त्यावेळेच्या फॅशन प्रमाणे छोट्या बाह्यांचे ब्लाऊज शिवले.
साल २०१८- आता सोशल मीडियावर #deepveer गाजतंय.
sabyasachi लुक वगैरे काय ते. आता दीपिकाच्या रिसेप्शनचे लुक बघा ना . ऑफ- व्हाईट प्लेन लांब हाताचा बंद गळ्याचा ब्लाऊज. खर सांगायचं तर आजीबाई सारखा वाटतोय तो मला. आणि सोनेरी कांजीवरम वर हिरवा मोठा चोकर ...वरती चपट , अगदी तेल लावल्यावर होतात तसे केस....कदाचित ह्यातलं सौंदर्य किंवा फॅशन कळण्याइतकी मी तज्ज्ञ नाही. बघून जे वाटलं ते लिहिलं. मात्र यावरून आजीची आठवण झाली. आजी म्हणायची " आपण करू ती फॅशन"... कदाचित या #deepveer आणि #virushka नंतर ही चपट केस आणि लांब बाह्या अगदी "in-thing in fashion" असेल.
आता माझ्या छोट्या बाह्यांचे ब्लाऊज 'out of fashion" नाही झाले म्हणजे मिळवलं. पण मग तेव्हा
आजी म्हणायची त्याप्रमाणे " आपण करू ती फॅशन"... म्हणायचं.
- धनश्री
No comments:
Post a Comment