मला आठवतं पूर्वी लहान मुलांना घेऊन भरपूर प्रवास करण्याची पद्धत नव्हती. आता बदलत्या काळानुसार लोकांचं प्रवास करण्याचं प्रमाण वाढलंय. लहान मुलाबरोबर प्रवास करायचा असेल तर व्यवस्थित तयारी हवी. एखादी गोष्ट जरी विसरलो तरी महागात पडू शकतं. उदा. तुम्ही तापाचं औषध विसरलात आणि बाळाला भर रात्री ताप आला तर अगदी धावपळ होते. ह्या लेखात मी अगदी छोटं - चार तासांच्याबाहेर जाण्यापासून आठवड्याभराचा प्रवासाची तयारी ह्याबद्दल लिहिणार आहे.
माझी मुलगी आता २ वर्षांची आहे. तिच्यासोबत मी मुंबई - बंगलोर हा प्रवास बऱ्याचदा केला आहे. कारण गेल्यावर्षी मी बंगलोरला नोकरी करत होते आणि आता माझा नवरा तिथे नोकरी करतो. असल्या प्रवासाची तयारी थोडी कमी असते कारण आपण एका घरातून दुसऱ्या घरी जाणार असतो. पण जर स्थलदर्शनासाठी प्रवास नवीन ठिकाणी करत असाल तर जास्त तयारी लागते.

लहान मुलाबरोबर कुठेही जाताना एक हॅण्डबाग असावी. त्याला आजकाल लोकं diaper bag पण म्हणतात.
त्या बागेत पुढील साहित्य असावं:
पाण्याची बाटली
बाळाचं खाऊ- दुधाची बाटली / लाडू / फळं इत्यादी; त्याबरोबर एक चमचा, वाटी
२ रुमाल, टिशू पेपर ,१ नॅपकिन साधे कॉटनचे ३-४ फडके( पटकन काही पुसायला लागले तर)
२ diaper / लंगोट
१ कपड्याचा सेट - कपडे मध्येच भिजले तर हा अगदी कामी येतो
१ दुपटं - ह्याचा पांघरूण /अंथरूण दोन्ही म्हणून वापर करता येतो
बेबी पावडर- उन्हाळ्याचा दिवसात घाम खूप येतो, त्यामुळे घाम पुसून पावडर लावावी. नाहीतर घामोळं येतं.
२-३ प्लॅस्टिकच्या पिशव्या

आता आपण जर लांब आठवडाभर प्रवास करणार असाल , तर ही पुढची यादी. प्रत्येक दिवशी तीन कपडे लागतील ह्या हिशोबाने कपडे घ्यावेत.दर दिवशी तीन कपडे जर जास्त वाटत असतील तर आपल्या गरजेनुसार कमी- जास्त घ्यावेत.कपडे घेताना हवामानाचा विचार करावा. जर थंडी असेल तर स्वेटर, कान टोपी, मोजे घ्यावेत. उन्हाळा असेल तर कॉटन, मलमलचे कपडे घ्यावेत. diaper / लंगोट भरपूर घ्यावेत.बाळासाठी लंगोट वापरात असाल तर मेणकापड असावं बरोबर. ४-६ दुपटी , ५-६ रुमाल, २ नॅपकिन, २ टॉवेल घ्यावेत. लहान मुलांचा साबण घ्यावा .जायच्या आधी शक्यतो लहान मुलांच्या डॉक्टर कडे मुलाला दाखवून यावे. त्यांच्या सल्ल्यानुसार एक औषधाचा बॉक्स घ्यावा. कमीतकमी तापाचं तरी औषध हवंच आपल्याजवळ आणि डॉक्टरची फाईल सुद्धा हवी . नवीन ठिकाणी जर बरं नसेल आणि डॉक्टरला दाखवायचं असेल तर ही फाईल हाताशी असेल तर बरं पडतं . मुलाला आवडणारं आणि टिकणारं सुकं खाऊ घ्यावं. थोडी खेळणी घ्यावी. मूल कंटाळले तर रमायला मदत होते. अजून काही वस्तू घ्याव्यात त्या म्हणजे- टूथब्रश , केसाचा ब्रश, १ बूटाचा जोड ,
diaper रॅश क्रीम, बेबी क्रीम (थंडीत लागत असल्यास)
अजून काही मुद्दे . आपण विमान प्रवास करत असाल तर हॅन्डबॅग मध्ये एक स्वेटर आणि टोपरं असावं . ह्याचं कारण असं कि आपण निघताना जरी थंडी नसेल तरी विमानात a.c मुळे थंडी वाजू शकते. डॉक्टरकडे दाखवायला जात असाल तर डॉक्टरची फाईल न्यायला विसरू नका. परदेशात प्रवास करणार असाल तर त्या देशाची माहिती काढून लहान मुलांसाठी काही विशेष लागतं का, ह्याचा विचार करा. ६ महिन्यांखालील बाळांना घेऊन लांब प्रवास करणार असाल तर तिकडे कशा प्रकारचं दूध आहे ते बघा . नाहीतर मिल्क फॉर्मुला ची सवय असेल तर तो नक्कीच घेऊन जा. कारण ६ महिन्याखाली बाळाला आपण दुधाखेरीज काही देत नाही. अंगावरच्या दुधावर असेल तर काही प्रश्नच नाही.
वरील यादी बघून- आपल्याप्रमाणे कमी-जास्त करून ही यादी लिहून ठेवा. मी ही यादी ई-मेल वर ठेवली आहे. त्या ई-मेल चे नाव मी
"Swara Packing Checklist " असे ठेवले आहे. Dr.
अतुल गावंडे ह्यांच्या "The Checklist Manifesto " ह्या पुस्तकाच्या नावावरुन मी ई-मेल ला असं नाव दिलं आहे. ह्या पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रात
checklists म्हणजेच याद्यांचा वापर करून कसा फायदा होतो हे सांगितलेलं आहे. अजून एक लक्षात घ्या ते म्हणजे, ही यादी माझ्या २ वर्षाच्या मुलीसोबत प्रवास करताना आलेल्या अनुभवावरून लिहिली आहे. थोडं मूल मोठा असेल तर त्याच्या गरज वेगळ्या असू शकतात.
मोठ्यांच्या प्रवासाच्या तयारीबद्दल वाचायचं असेल तर सायली मावशीचा ब्लॉग वाचा - अगदी उत्तम लिखाण आहे. https://sareesandotherstories.blog/…/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0…/
तर तुम्ही लहान मुलाबरोबर जाताना काय काय तयारी करता? अजून काही नेता का? जरूर कळवा !
No comments:
Post a Comment