आज माझ्या बाबांचा वाढदिवस -कितवा ते महत्वाचा नाही. महत्वाचं हे कि अजूनही ते तरुणच आहेत. काम करण्याचा त्यांचा उत्साह आणि चिकाटी मला लाजवेल अशी आहे.
बाबांचं जन्म वेंगुर्ल्यात झाला. दहावीपर्यंत ते तिकडे शिकले आणि मग सायन्स कॉलेजसाठी मुंबईला आले.
बाबांच्या लहानपणी घरची आर्थिक परिस्तिथी जेमतेमच होती. पण त्या परिस्तिथीत सुद्धा बाबांनी अभ्यास करून उत्तम यश मिळवले. scholarship मिळवली. बाबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. पपेरसुद्धा ते अगदी पूर्णपणे वाचतात. त्यांचं drawing उत्तम आहे. लहानपणी ते कविता करायचे. मला जेव्हा बाबांचे गावातले मित्र , ओळखीचे भेटतात तेव्हा बाबांच्या हुशारीबद्दल नेहेमीच कौतुक असतं .
मुंबईत आल्यानंतर त्यांनी पार्ले कॉलेज( साठ्ये कॉलेज) मध्ये सायन्स साठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना इंजिनीरिंग साठी V.J.T.I मध्ये प्रवेश मिळाला. माझे बाबा V.J.T.I मधून B.E (Mechanical ) डिग्री होल्डर आहेत. मुंबईत १० बाय १० च्या एका खोलीत राहण्यापासून ते स्वतःच घर घेण्यापर्यंतचा प्रवास मला नेहेमीच प्रेरित करतो. मुंबईत नवीन असून 35व्या वर्षी बाबांनी मुंबईत स्वतःचा एक फ्लॅट घेतला ही किती मोठी गोष्ट आहे हे मला स्वतःचा संसार सुरु झाल्यावर कळलं.
लहानपणी बाबा मला अंघोळ घालून शाळेसाठी रेडी करून मग ऑफिसला जायचे. Maths चा अभ्यास तेच घ्यायचे .अगदी कॉलेजमध्ये असतानासुद्धा मला बाबांचं खूप मार्गदर्शन होतं बाबांमुळे मी फोकस करायला शिकले. बाबांचं म्हणणं हेच, कि तू दहा गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. एक- दोन गोष्टी कर पण त्या अगदी टॉप कर . दुसरी बाबांची शिकवण म्हणजे काहीही नवीन सिनेमा असो, शॉपिंग असो, आपलं काम संपवून मग ते करायचं .त्यामुळेच कंटाळा आला म्हणून फिरायला गेलो आणि काम तिकडेच असं मी कधीच करत नाही. मी IIM मध्ये असताना सुद्धा homesick झाले, किव्वा थोडा स्ट्रेस वाटला तरी बाबा मला भेटायला यायचे.
बाबांचं घरात सगळ्या कामात लक्ष असतं आणि ते काम करतात सुद्धा. त्यामुळे मुलांना हे जमत नाही, करत नाही ह्या मागासलेल्या संस्कृतीची मला अजिबात सवय नाही.
माझ्या बाळंतपणासाठी आई मुंबईला आली असताना माझ्या बाबांनी बंगलोरला स्वयंपाक केला. तेव्हा बाबा आणि आई भावाबरोबर बंगलोरला होते.
माझ्या मोठ्या मुलीला जवळजवळ २ वर्षांपर्यंत माझ्या आई, बाबा आत्यांनीच सांभाळलं . तेव्हा मला आठवतंय मला एका नातेवाइकाने सांगितलं होतं - " आजोबांकडून नातवंडाला सांभाळण्याची अपेक्षा कारणच चुकीच आहे " . मला ते फार विचित्र वाटलं - एका परदेशी शिकलेल्या मुलीचे इतके बुरसटलेले विचार कसे असू शकतात . नंतर लक्षात आलं कि तिच्या बाबांनी तिच्यासाठी किंवा घरासाठी नोकरीशिवाय काही केलं नसल्यामुळे, पुरुष मुलांना सांभाळू शकतात हे तिला पटत नव्हतं.
माझे बाबा माझ्या मुलीला भरवायचे, शी सु चा diaper सुद्धा बदलायचे.
गेल्या सात वर्षात मी आणि माझ्या नवऱ्याने अनेक घरं बदललीत. त्या शिफ्टिंग मध्ये , आमच्या बरोबरचा कॉन्स्टन्ट सपोर्ट म्हणजे बाबा. सपोर्ट काय, खरा सांगायचं तर त्यांनीच आमचं शिफ्टिंग केल . गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मी नवीन ठिकाणी शिफ्ट झाले. त्यावेळेला माझ्याबरोबर ३ महिन्याचा बाळ होतं . बाबासोडून आम्हाला दुसरं कोणीही मदत करायला नव्हतं . मावशी मला १० दिवस मैत्रिणीकडून आणलेला डबा पोचवत होती. त्या घरात शिफ्टिंग च्या आधी गॅस लावण्यापासून , साफ सफाई करून घेण्यापासून ते सगळं सामान लावेपर्यंत बाबा आमच्यासोबत होते. ते करण्यासाठी ते मालाड ते दादर येत होते. आम्ही शिफ्ट झाल्याच्या २-३ दिवसानंतर माझ्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला होता. २-३ दिवसातच एवढं कसं लावून झालं हे बघून तो आश्चर्यचकित झाला. सगळी बाबांची कमाल होती.
लोक मोठे मोठे शब्द वापरतात - आम्ही मुलांना exposure देतो, हे करतो ते करतो. बाबा स्वतःची शोबाजी करणार नाहीत. पण माझ्यासाठी जे त्यांनी केलाय त्याला मी women empowerment म्हणते. त्यांचा आधार, ते कधीही माझ्यासाठी धावून येतील हा विश्वास, माझ्या मुलींची काळजी घेतील हा कॉन्फिडन्स त्यामुळे मी नोकरी करू शकते आणि माझ्या मुलींसमोर एक करिअर ओरिएंटेड वूमन चा आदर्श ठेऊ शकते.
- धनश्री
No comments:
Post a Comment