२००० साली झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रियांका चोप्रा त्यावर्षीची मिस वर्ल्ड ठरली. मिस वर्ल्ड या स्पर्धेत तिला जो प्रश्न विचारला गेला होता त्याचं खरंतर तिने चुकीचं उत्तर दिलं होतं. असा प्रश्न विचारण्यात आला होता "तुम्हाला सर्वात आवडणारी हयात स्त्री कोण?" त्यावर तिचं उत्तर होतं मदर तेरेसा.तिने ते उत्तर अतिशय आत्मविश्वासाने दिलं म्हणून तिला मिस वर्ल्ड ठरवण्यात आलं.यावरून काय बोध घ्यावा हेच मला कळत नव्हतं. ही स्पर्धा झाली तेव्हा खरंतर मी शाळेत होते. तेव्हाही वाटायचं आणि आत्ताही वाटतं नुसता आत्मविश्वास आहे म्हणून चुकीचं उत्तर बक्षिशास पात्र ठरतं का? अशा उत्तरांना बक्षीस दिल्याने आपण जनतेला काय सांगतो - नुसता आत्मविश्वास महत्वाचा , माहिती चुकीची असली तरी चालेल?सामाजिक जीवनात अनेक लोक भेटतात जे काही न करतासुद्धा आपण किती केलं हे आत्मविश्वासाने सांगू शकतात. ती एक वेगळी कलाच आहे. माझ्या शैक्षणिक जीवनातला एक अनुभव सांगते- मी IIM बंगलोर मधून MBA केलं. तिथे मात्र एक जाणवलं - तिकडच्या प्रोफेसर्स समोर तुम्ही काही तयारी/ अभ्यास न करता काहीही मोठमोठ्या गप्पा मारल्या तर तुम्ही तिकडच्या तिकडे पकडले जाता.त्या प्रोफेसर्सना सर्वसाधारण सगळ्याच विषयांची माहिती असते.
आत्मविश्वासाला बुद्धीची किव्वा कर्तृत्वाची साथ हवीच, नाही का? तुम्हाला काय वाटतं?
-धनश्री
-धनश्री
No comments:
Post a Comment