पु. ल . देशपांडे हे प्रत्येक मराठी माणसाचे लाडके. आज पु. ल असते तर काय बोलले असते हा प्रश्न सतत पडतो. मी माझ्या मुलीसाठी नर्सरी शाळा शोधताना अनेक मजेशीर अनुभव आले. ते अनुभव मी पुलंच्या शब्दात मांडले आहेत.
संदर्भ : पुलंचा "नवीन घर मालकांचा उत्साह". त्याची ही लिंक आहे: https://www.youtube.com/watch?v=dAEe3WtwgPE
आज पुलं असते तर मुलांच्या नर्सरी प्रवेशाबद्दलचे अनुभव ते कसे बोलले असते? वाचा पुढे
सोयी हा तर शाळेतल्या लोकांचा माहिती देतानाचा उच्छाद असतो. सोयी, काय सोयी केल्या आहेत?. Visiting faculty, extracurricular activities, field trips, creative development , learning cum creativity, creativity cum fun,माती कम दगड , एक ना दोन. शाळेला A.C. किती आहेत आणि वीज गेल्यावर generator कसा चालू होतो आणि मुलांना घाम कसा येत नाही याचंच कौतुक. एका उत्साही शाळेच्या मुख्याध्यापकाने तर आपण मुलांना सगळी कामं कशी करायला शिकवतो म्हणून झाडू मारायला शिकवतो असंही सांगितलं होतं . झाडू कोणाला मारायला शिकवतो हेच फक्त सांगितलं नव्हतं . मी जरा भांबावलोच.
All- round development , Visiting faculty, extracurricular activities, field trips, creative development यापैकी काहीही न बोलता शाळा दाखवणारा जर कुणाला भेटला असेल तर मला सांगा. मी टिळक किव्वा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे. आणि मालकीण असली तर... तर काही नाही हिच्याकडून ओटी भरून घेईन..
मुलीच्या शाळेचं बघताना मी अशा लोकांच्यात नेमका अडकतो. नुसतं एखाद्याने सगळ्या सोयींसकट शाळा दाखवली तरी चालेल. पण दाखवताना आणि सांगताना नुसती परीक्षा घेत असतात. मला एका शिक्षकाने विचारले " तुमच्याकडे तुमच्या मुलीच्या प्रोजेक्ट साठी वेळ द्यायला असेल ना?" मी हा प्रश्न टाळण्यासाठी "वेळ असेल का ते वेळ आल्यावर बघू " असं सांगितलं . पण नाही इथवर ते थांबत नाही, लाखभर फी घेऊन लाखभर प्रश्न विचारायचा पगार मिळत असावा त्यांना. "अहो तुमच्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे".... मी म्हणालो " मुलीचं भवितव्य माहित नाही, पण हे सगळं बघून मला माझ्या भवितव्याबद्दलचे प्रश्न पडले आहेत. आपण नक्की काय करतोय, ऑफिस मध्ये प्रोजेक्टचे काम करून पैसे कमावतोय, तीच भरपूर रक्कम शाळेसाठी मोजतोय आणि मग त्यांचे प्रोजेक्टही आपणच करतोय.. ?"
-धनश्री

No comments:
Post a Comment