Saturday, November 4, 2017

"ज्यादा "मुलगी

" अगं बाई , मुलगी MBA आहे, ज्यादा असेल" समोरच्या काकू म्हणाल्या . मुलाच्या लग्नासाठी स्थळं बघत होत्या.अशा काकू तुम्हाला जागोजागी दिसतील. जास्त शिकलेली मुलगी म्हणजे ज्यादा असं समज असणारे भरपूर लोक आहेत. मी स्वतः MBA आहे आणि माझ्याबद्दलही काही लोकांचे समज असेच असतील. लोकांचं काय , काही बोलतात. म्हणजे मुलगी माहेरी खूपदा आली तर बोलतील, सासरी त्रास देतात म्हणून येतेय. माहेरी आली नाही तर म्हणतील, माहेरी पाठवत नाही . फक्त अशा बोलण्यामुळे समाजात काही संकल्पना , ढाचे तय्यार होतात.आणि ते ढाचे सोडून काही दुसरी बाजू आहे असं मला सांगावंसं वाटतं. मुळात कोणी  " ज्यादा - शहाणपणा" दाखवायला त्याला अमुक एक शिक्षण घ्यावं लागतं असं मला वाटत नाही. खरं सांगायचं तर, शिक्षण घेताना माझ्यापेक्षा इतकी हुशार लोकं भेटली, की आपण तर काय मोठं करतोय, आपण त्यातले एकच असं वाटायचं. आणि जो असे कष्ट घेऊन काही मिळवतो, त्याचे पाय जमिनीवरच असतात.

ज्यादापणा हा मूळचा गुणच असतो काही लोकात. शिक्षणाने तो बळावत असेल कदाचित. पण ज्यादा असायला शिक्षण वगैरे काही लागत नाही. ज्यांना कमी कष्ट करून काही गोष्टी मिळतात, काही फुकटचं कमी त्रासात मिळतं असे लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं की मनुष्य उडतो. मग तो ज्यादा होतो.

शेवटी फुकटचं मिळालेलं  किती दिवस टिकणार? त्यामुळे त्या बळावर तर उडू नये.जास्त वरती उडलं तर पडण्याची शक्यता जास्त. त्यामुळे पाय नेहेमी जमिनीवरच असावेत.जो खरा मेहनती असतो तो नेहेमीच साधा राहतो. कष्ट न करता जेव्हा काही जास्त मिळतं , तेव्हा मात्र मनुष्य ज्यादा होतो. कारण ती मिळवणूक ही त्याच्यासाठी "ज्यादा " असते, त्याच्या कल्पनाशक्तीच्या आणि कर्तृत्वाच्या बाहेरची....
- धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...