"जे मिळेल त्यात आपला संसार भागवायचा " / Cut your coat according to the cloth किती जुनाट आहे . आजच्या २१ व्य शतकात आयुष्य फक्त मजा करण्यासाठी असतं, नाही का? मग ती मजा परवडली नाही तर काय जीव द्यायचा? म्हणजे अगदी युरोप टूर करता नाही आला, नवीन स्मार्टफोन घेता नाही आला की आपला आयुष्य संपलंच म्हणायचं. स्ट्रेस खूप येतो, डिप्रेशन वाढलं आहे आजच्या तरुण पिढीचं. याचं कारण काय - आपण आपल्या गरजा वाढवल्याहेत. त्या पूर्ण झाल्याचं पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. आणि त्या पूर्ण नाही होणं हे तर आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं आहे.
माझ्या "bucket list" मध्ये या गोष्टी करायच्या उरल्या आहेत असं हल्ली मी ऐकते गप्पात. अरेच्चा कसलं हे bucket , मला तर पाण्याचं bucket माहित आहे फक्त. तर हे आहे न पूर्ण झालेल्या इच्छांचं bucket. आपल्याला हव्या त्या गोष्टींची यादी बनवायची आणि त्याला bucketlist म्हणायचं. पाण्याच्या bucket ला एक भोक असेल तर काय, bucket गळेल आणि भरणारंच नाही. तसचं काहीसं असतं आपल्या bucket list च. एक गोष्ट / इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा / गरज निर्माण होते.त्यामुळे याबाबतीत जुनं ते सोनं त्याप्रमाणे "cut your coat according to cloth" बरोबर वाटतं.
आपल्या इच्छांवर ताबा ठेवणं आपल्या हातात आहे, परिस्थितीशी जुळवून आपल्या अपेक्षा ठेवणं शहाणपणाचं. परिस्थिती म्हणजे नुसती आर्थिक नव्हे तर इतर सोय, मानसिक जडणघडण यावर अवलंबून असते.आयुष्यात प्रत्येकाच्या priorities वेगळ्या असतात. त्यामुळे एकाने एक केलं, तर दुसर्याने ते करायलाच हवं असा नाही.
ही पोस्ट लिहिण्याचं एक कारण म्हणजे आजकाल कंपन्या भरपूर मार्केटिंग करून वस्तू विकतात. जनतेला सारखं काहीतरी नवीन दाखवून त्याची गरज निर्माण करायची. तर अशा मार्केटिंगला भुलून जाण्याआधी आणि त्या वस्तू घेण्याच्या/ करण्याच्या आधी आपल्याला त्यांची गरज आहे का हे प्रथम तपासावं. नंतर ती गरज भागवणं शक्य आहे का हे बघावं. ते शक्य नसेल तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला हवी ती प्रत्येक गोष्ट मिळत नाही. जो २५ किलोचं वजन वाहवून नेऊ शकतो तो ते विकत घेऊ शकत नाही, आणि जो ते विकत घेऊ शकतो तो ते वाहवून नेऊ शकत नाही.
No comments:
Post a Comment