CAT(Common Admission Test) ही परीक्षा IIM MBA प्रवेशासाठी द्यावी लागते. मला MBA केलं तर IIM मधूनच करायचं होतं. MBA साठी नुसती CAT देऊन भागत नाही. त्यानंतर इंटरव्ह्यू असतोच. तो यशस्वीपणे पार पडला तरच IIM मध्ये प्रवेश मिळतो. तसं नाही झालं तर परत पुढच्यावर्षी CAT द्यावी लागते आणि प्रवेशमिळेपर्यंत हे चक्र चालूच राहतं.या चक्रावरील ही कविता.
मांजरीच्या मागे लागलीस आहेस का ?
वेडी तू झाली आहेस का?
वेडीबिडी काही झाली नाही हो
MBA च्या मागे धावते आहे हो
सी ए टी CAT , CAT माने बिल्ली
MBA प्रवेशाची ही आहे किल्ली
आर ए टी RAT , RAT माने चूहा
Percentile च्या RatRace मध्ये फसले बुआ
दर नोव्हेंबरला येते न चुकता
देवाला साकडं घालते बाहेर पाड यातून एकदा
किती ती तयारी, किती ते Mock Paper
काहीही करून मला CAT मध्ये पास कर
CAT देऊन होताच Interview ची तयारी
निकाल काही लागो, पुढची तयारी करते कुमारी
जानेवारी महिन्यात निकाल लागतो
Percentile च्या बळावर Interview Call येतो
Interview साठी पुन्हा ती तयारी
सगळे Interview झाल्यावर हुश्श:!! म्हणते बिचारी
निकाल लागेपर्यंत मनासारखं जगूया
काही नाही झालं तर पुन्हा CAT देऊया
निकाल चांगला लागताच, कुमारी पेढे वाटते
MBA च्या तयारीला लगेच लागते
निकाल खराब लागता, कुमारी हताश होते
वेड्यासारखी परत मांजरीच्या मागे धावू लागते
सी ए टी CAT , CAT माने बिल्ली
MBA प्रवेशाची ही आहे किल्ली
--धनश्री
#marathipost #marathikavita
No comments:
Post a Comment