आपल्याला आपण केलेल्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागणं यासारखी दुसरी असुरक्षितता नाही. आम्ही असं करतो म्हणून असं होतं, हे सारखं सारखं का सांगावं लागतं? स्वतःलाच आपण जे करतो ते जेव्हा चुकीचं वाटतं तेव्हा ते कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी कारणं दिली जातात. मग आजीने सांगितलेले बोल आठवतात "अगो मुर्खांच्या तोंडी लागू नये". या वाक्याचा पदोपदी अनुभव येतो. मूर्ख माणसाला बोलायला फक्त तोंड लागतं, डोकं लागत नाही. मुळात डोकं वापरायचंच नसतं. काही दिवसांपूर्वी रेणुका खोत या मराठी ब्लॉगरचा एक लेख वाचला.
त्यात तिने "वैचारिक दारिद्य रेषेखाली " हा शब्द वापरला. आता कुठेही बोलण्याच्याआधी किव्वा तोंडाची वाफ घालवण्याआधी मी हा विचार करते. त्या माणसाची वैचारिक जडण घडण कशी असेल. जेव्हा वैचारिक दारिद्र्य जाणवतं तेव्हा मी बोलतचं नाही.
--धनश्री

No comments:
Post a Comment