Thursday, July 20, 2017

नस्तेप्रश्न

एकदा "होम मिनिस्टर" ह्या कार्यक्रमात मुंबईत नोकरी करणाऱ्या पण पुण्यात राहणाऱ्या बायका आल्या होत्या. त्यातल्या एकीने आपले काही अनुभव सांगितले. ती म्हणाली लोकं तिला विचारतात "अगं तू रोज मुंबई पुणे करतेस , एवढा वेळ घराच्या बाहेर असतेस , तुझ्या मुलांवर संस्कार कोण करणार?" तिने त्यांना सांगितले " माझ्या मुलांवर अंत्यसंस्कार करण्याची पाळी येऊ नये म्हणून नोकरी करते.भुकेने मरू नयेत म्हणून पैसे कमावते."
कधीकधी लोक असे नसते प्रश्न( प्र) विचारतात. अर्थात हे प्रश्न हितचिंतकांनी किंवा मित्रमैत्रिणींनी विचारले तर काहीच वाटणार नाही. पण जेव्हा हे प्रश्न काहीही कारण नसताना मुद्दामून हिणवण्यासाठी / काही दुसरं साध्य करण्यासाठी विचारले जातात तेव्हा त्यांना नसती उत्तरं( )द्यावी लागतात. प्रश्न कुठल्या हेतूने विचारला जातोय हे कळायला आपण सुजाण असतो.चांगल्या हेतूने प्रश्न विचारला गेला तर त्याला खरी सरळ उत्तरं असतात. नाहीतर नस्ती उत्तरं असतात.तर ही आहे नस्ते प्रश्न नस्ती उत्तरं "series "
नप्र: तुम्ही एवढं MBA केलयं, आणि तुम्ही रोज लोकलने प्रवास कसा करता?
नउ : लोकल कुठल्या प्लॅटफॉर्म वर लावली आहे ते बघते, मग त्या प्लॅटफॉर्म वर जाऊन लोकल पकडते
प्र : असं राहणं तुमच्या "standard " ला शोभत नाही
: माझा standard काय आहे याचा विचार करायला माझ्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे त्याला शोभून राहणं वगैरे पुढचं.
प्र: तुम्हाला एवढं काम करून कंटाळा येत नाही का, एवढं करण्याची काय गरज आहे?
: फुकटचे पैसे मिळण्याची सवय नाही आहे.
पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागतं.
प्र: तुम्ही 1 BHK मध्ये एवढी लोकं कसे राहू शकता?
: श्वास घेऊन राहतो. "Breathe in .. Breathe out"
ही उत्तरं देऊन खदाखदा हसा. मग कामाला लागा. ही उत्तरं दिल्यानंतर असले प्रश्न परत येण्याची शक्यता कमी.


No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...