" काय बाई हिला नोकरी करायला काय झालं, संसाराला जरा हातभार नाही लागणार का?
मुलांच्या शिक्षणाला हल्ली किती खर्च येतो. "
मुलांच्या शिक्षणाला हल्ली किती खर्च येतो. "
"दिवसभर नुसती ऑफिसमध्ये असते. हिच्या मुलांवर संस्कार कोण करणार? नुसते पैसे मिळवले आणि शाळेची फी दिली म्हणजे झालं का?"
वरील दोन्ही परस्पर विरोधी विधानं आपण कित्येकदा ऐकतो. कोण बरोबर आणि कोण चूक हे कोणी सांगायचं? कुठल्याही घरातील संपूर्ण परिस्तिथी माहित असल्याशिवाय
आपण काय बरोबर आणि काय चूक हे सांगू शकत नाही. मुळात हे सांगण्याचा बाहेरच्या माणसाला हक्कच नाही.
मनीषा म्हैसकर ह्यांच्या मुलाच्या आत्महत्येवरून पालकत्वाचे धडे whatsapp वरून गिरट्या घालत होते.त्यांचं कुठे चुकलं किंवा मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे मुलाला वेळ न देता आल्यामुळे हे सगळं झालं इत्यादी इत्यादी सांगणारे . माझी त्या धड्यांबद्दल जी काही मतं आहेत , ती आपण पुढे बोलूच. फक्त ते धडे देणारे/ फॉरवर्ड करणारे जे कोण आहेत त्यांच्याबद्दल मला भारी मजा वाटतेय. ते धडे त्यांच्या आयुष्यात ते किती पाळतात हे आधी बघावं . आणि मग दुसऱ्यांना शहाणपण शिकवावं.
माझी आजी म्हणायची "दुसऱ्या शिकवेब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण"
माझी आजी म्हणायची "दुसऱ्या शिकवेब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण"
कॉलेज मध्ये असताना मनीषा म्हैसकर माझ्यासाठी एक यशस्वी स्रीचं प्रतीक होत्या. माझी मावशी हाफकिन इन्स्टिटयूट मध्ये नोकरी करायची. ती हाफकिन डायरेक्टर सौ. मेधा गाडगीळ यांची सेक्रेटरी होती. मेधा गाडगीळ स्वतः IAS अधिकारी असल्यामुळे मावशीची कामानिमित्त
बऱ्याच IAS अधिकाऱ्यांशी
भेट- गाठ व्हायची. तसंच ती एकदा मनीषा म्हैसकर यांना भेटली होती. अतिशय प्रभावी आणि हुशार व्यक्तिमत्त्व असं मावशीचं मनीषा म्हैसकर बद्दल मत झालं. त्यामुळे मनीषाताईंबद्दल त्यांची हुशारी, कर्तबगारीता हे चांगले गुण मी लक्षात घेतले. मुख्य म्हणजे लहानपणापासूनच असे संस्कार आहेत की दुसऱ्यात जे काही चांगलं आहे ते घ्यायचं आणि वाईट आहे ते सोडून द्यायचं.मनीषाताईंबद्दल ऐकून वाचून त्या माझ्यासाठी एक आदर्श स्री होत्या.
मनीषा ताईंच्या पालकत्वाचे पोस्ट मॉर्टेम करणारे जे messages whatsapp वर फिरता आहेत, त्या काही मुद्द्यांशी
मी सहमत आहे. पण हे मुद्दे लगेच त्यांच्या पालकत्वावर ताशेरे नं ओढता, सहज चर्चेचा विषय होऊ शकतात. आणि त्यांची चर्चा लगेच दुसऱ्या दिवशी कशाला?त्यांना जरा श्वास घेऊ द्या. IAS अधिकारी म्हणजे त्यांचं मुलांकडे वेळ नसल्यामुळे लक्ष नसणार हे आपण कसं गृहीत धरू शकतो?घरी असणारे किती पालक आपल्या मुलांना वेळ देता आहेत? मुलांना वेळ देणं आणि नोकरी करणं ह्या "mutually
exclusive " events नाही आहेत.
आता हा मी "Co -ordinate geometry " सारखा "graph " बनवला आहे.
आता हा मी "Co -ordinate geometry " सारखा "graph " बनवला आहे.
त्याचे चार भाग आहेत पुढील प्रमाणे:
१. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे/व्यवस्थित संगोपन करणारे
२. नोकरी करणारे पालक आणि मुलांना वेळ न देणारे /व्यवस्थित संगोपन न करणारे पालक
३. नोकरी न करणारे पालक आणि मुलांना वेळ न देणारे /व्यवस्थित संगोपन न करणारे पालक
४. नोकरी न करणारे पालक आणि मुलांना वेळ देणारे/व्यवस्थित संगोपन करणारे पालक
बहुतांश लोकांचा असा समज असतो की फक्त दोनच प्रकारचे पालक असतात ते म्हणजे २ किंवा ४ सारखे. १ आणि ३ सारखे पालक असू शकतात असं लोकांना वाटतंच नाही.
आता हे खरं आहे की नोकरी करणारे पालक घरी राहणाऱ्या पालकांपेक्षा वेळ कमी देऊ शकतात. पण घरी आल्यावर ते वेळ देत नसतील कशावरून? आणि नोकरी न करणारे पालक असणारा वेळ मुलांसोबत सक्रियपणे घालवतात हे कशावरून? कशावरून ते बाहेर फिरायला जात नसतील?
मुळात मूल कसं निपजतं ह्याच्यावरून आपण पालकत्वाची प्रगतिपुस्तके लिहू शकत नाही. आपण फक्त दुरून निष्कर्ष बांधू शकतो. खूप कष्ट घेऊन सुद्धा मुलं चांगली निपजतील असं नाही. आणि काही न करून सुद्धा काही मुलं अगदी व्यवस्थित निघतात. कारण मुलांच्या जडणघडणीत जरी आई वडिलांचा वाटा मोठा असला तरी आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी मुलांवर कळत नकळत संस्कार करत असतात. याचा अर्थ आपण मुलांकडे लक्ष देऊ नये असं नाही. आपण आपल्या परीने मुलाचं अगदी व्यवस्थित संगोपन करावं. पुढे काय घडेल हे आपण सांगू शकत नाही.आपण आपल्याला जे जमतं ते अगदी करावं आपल्या मुलासाठी . त्याचं मोजमाप आपल्याला रात्री लागणारी झोप असते. आपण आपली कर्तव्य व्यवस्थित करत असू तर आपण अगदी शांतपणे झोपू शकतो.

मला वाटतं काही लोकांना कुणाचं चांगलं बघवतच नाही. मनीषा आणि मिलिंद म्हैसकर हे करिअरच्या दृष्टीने एक यशस्वी जोडपं होतं. त्यांच्यात चुका काढण्यासारखं
अजून काही समाजाला मिळत नव्हतं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली - झालं त्यांच्यावर
ताशेरे ओढण्याचं जणू काही कारणंच मिळालं.
आता हेच बघा एक दुसरी बाजू. मनीषा म्हैसकर ह्याऐवजी एक गृहिणी असती. अगदी आपल्या संसारात रमणारी , नवरा मुलं बाळांना बघणारी. तिच्या मुलाच्याबाबतीत
असं काही झालं असतं तर लोकांनी म्हटलं असता "काय ही सारखी घरी असायची. मुलांच्या गरजा बाहेर पडल्याशिवाय
कशा कळणार? " ठपका ठेवायचा असेल तर तो कसाही ठेवता येतो
शेवटी मला अमर प्रेम मधील हे गाणं आठवतंय:
"कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम है कहना
छोडो बेकार की बातों को.."
शेवटी मला अमर प्रेम मधील हे गाणं आठवतंय:
"कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम है कहना
छोडो बेकार की बातों को.."
--धनश्री
No comments:
Post a Comment